निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा रस्त्याच्या दुतर्फा दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचे प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा रस्त्याच्या दुतर्फा दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचे प्रारंभ

 निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा रस्त्याच्या दुतर्फा दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचे प्रारंभ

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम,3 कि.मी. चा रस्ता हिरवाईने नटणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
डोंगररांगा व रस्ते हिरवाईने फुलविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने  निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) 3 कि.मी. च्या रस्त्याच्या दुतर्फा दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचे प्रारंभ वृक्षरोपणाने करण्यात आले. यावेळी वनरक्षक अधिकारी अफ्सर पठाण, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, उद्योजक अरुण फलके, काशीनाथ पळसकर, उत्तम निमसे, संदिप डोंगरे, सदाशिव कापसे, राजू भगत, संतोष रोहकले, गणेश येणारे आदि उपस्थित होते.
वनरक्षक अधिकारी अफ्सर पठाण यांनी वृक्षरोपण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले असून, सर्वांनी ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याची गरज आवश्यकता निर्माण झाली आहे. तर पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. पै.नाना डोंगरे म्हणाले की, वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे अनेक झाडे नाहीसी झाली. झाडांची ही उणीव भरुन काढण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हापासून रस्त्यांच्या कडेला वृक्षाखाली विसावा घेताना वृक्षांची खरी गरज समजते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडांमुळे रस्ता शोभून दिसतात तर पर्यावरणाचे समतोल देखील साधले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी प्रत्येक नागरिकांनी नैतिक जबाबदारी म्हणून वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले.
 निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा रस्त्याच्या दुतर्फा शिसू, निम, अर्जुन सादाडा, वावळा, बेल, करंज, चिंच, सिताफळ, बेहडा आदी प्रकारच्या दीड हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तर फक्त रोपे न लावता त्याचे संवर्धन देखील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल दिलीप जिरे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment