पाचशे झाडे लावण्याच्या उपक्रमास निमगाव वाघा येथे सुरवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

पाचशे झाडे लावण्याच्या उपक्रमास निमगाव वाघा येथे सुरवात

 पाचशे झाडे लावण्याच्या उपक्रमास निमगाव वाघा येथे सुरवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पर्यावरण व वातावरणाच्या समतोलासाठी गेल्या चार वर्षापासून विविध भागांमध्ये व्रुक्षारोपण व संवर्धनचा उपक्रम राबवणार्‍या गो ग्रीन नगरच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील छाया नगर परिसरात 500 झाडे लावण्याच्या उपक्रमास जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरवात करण्यात आला. या उपक्रमास छाया फाउंडेशन, सकल राजस्तानी युवा मंच, टच फाउंडेशन, मैत्री 93 आदी ग्रुपचे सहकार्य झाले.
सकल राजस्तानी युवा मंचचे धनेश कोठारी म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र आम्ही वर्षभर व्रुक्षारोपण व लावलेले व्रुक्ष दत्तक देण्याचा उपक्रम राबवून संवर्धनही करत आहोत. यासाठी विविध संस्थांचे सहकार्य होत आहे.
प्रास्ताविकात सुशील ओस्तवाल म्हणाले, गो ग्रीन ग्रुपच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त निमगाव वाघा येथे 15 फुट उंचीचे जास्त ऑक्सिजन देणार्‍या 500 झाडांची लागवड केली आहे. या वृक्षा रोपण उपक्रमा मुळे या परिसातील निसर्ग बहरणार असल्याने या परिसराचे वैभव वाढणार आहे.यावेळी गणेश सातपुते, अमित मुथा, अमोल वैद्य, विकास सुराणा आदींनी परिश्रम घेतले. विविध क्षेत्रातिल मान्यवरांनी व्रुक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here