शहीद जवान राजेंद्र खुळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

शहीद जवान राजेंद्र खुळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 शहीद जवान राजेंद्र खुळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चिरंजीव शुभम, कन्या ऋतिका व शिवानी खुळे यांच्याकडून पार्थिवावर अग्निसंस्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः भारतीय सैन्यामध्ये कार्यरत शहीद जवान सुभेदार राजेंद्र पांडुरंग खुळे वय 45 यांचे रविवारी  6 जून रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले .त्यांचा पार्थिव जम्मू येथून रात्री त्यांच्या मूळ गावी लिंपणगाव अंतर्गत असणारी मुंढेकरवाडी येथे रात्री दहा वाजता दाखल झाला.   मुंढेकरवाडीच्या प्राथमिक शाळेत त्यांचे शेव  ठेवण्यात आले त्यानंतर आज बुधवारी 9 जून  रोजी सकाळी आठ वाजता जन्मभूमी मुंढेकरवाडी येथे पार्थिव देह सजवून वीर जवान  राजेंद्र खुळे अमर रहे  च्या घोषणेने मुंढेकरवाडी व लिंपणगाव परिसर दणाणून गेला होता .वीर जवान राजेंद्र खुळे यांचे पार्थिव ट्रॅक्टरद्वारे सजवून प्रभात फेरी काढण्यात आली. अनेक आबालवृद्धांनी  त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण दिसून येत होते. त्यानंतर लिंपणगाव येथे गावच्या मुख्य पेठेतून पार्थिव मिरवणूक काढून गावामध्ये देखील आबालवृद्धांनी वीर देहाचे दर्शन घेतले. .याप्रसंगी मुंढेकरवाडी लिंपणगाव येथे महिला वर्गांनी आपल्या दारासमोर सडा-रांगोळी काढून शहीद जवान राजेंद्र खुळे यांना मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर लिंपणगाव येथील क्रीडांगणाच्या भव्य पटांगणामध्ये त्यांच्यावर सकाळी सव्वा अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव शिवम खुळे, कन्या कृतिका खुळे आणि शिवानी कुळे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील व शिरूर ,पारनेर, कर्जत, नगर तालुक्यातील आजी माजी सैनिक तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने हितचिंतक यावेळी उपस्थित होते. या याप्रसंगी  अनेकांना  अश्रू अनावर झाले होते . यावेळी तालुक्यातील आपल्या लाडक्या वीर जवानाला अखेरची भावपूर्ण श्रद्धाींजली वाहण्यासाठी तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पाटील भोसले, केशवराव मगर, माजी सैनिक विठ्ठल जाधव ,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप सांगळे, प्रांत अधिकारी सौ स्वाती दाभाडे, श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव  ढिकले आदींनी वीर जवान राजेंद्र  खुळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र वाहिले नंतर अहमदनगर येथील सैन्यातील जवानांनी त्यांना अंत्यसंस्कार समय परेड घेऊन मानवंदना दिली. शाहिद जवान राजेंद्र खुळे यांचे पार्थिव लिंपणगाव या कर्मभुमीत पोहोचल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय तसेच त्यांचे कुटुंबीय आई छबुबाई  तसेच मित्रपरिवार आदींनी उपस्थित राहून सुभेदार राजेंद्र खुळे यांना यावेळी अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान या आपल्या भारतीय सेनेतील शहीद जवान सुभेदार राजेंद्र खुळे यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, अ‍ॅड अशोकराव रोडे ,नायब तहसीलदार चारुशिला पवार, सौ ढोले ,बाळासाहेब गिरमकर ,गावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर ,अपंग प्रणित संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे, माजी सरपंच सुनील जंगले, ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी सदस्य गावातील तरुण कार्यकर्ते आदि सह हजारोच्या संख्येने जनसमुदाय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्याला सैनिकांचा वारसा असून तालुक्यात सुमारे 80 वीर सैनिक शहीद झाले असून तालुक्याच्या ठिकाणी मोठे शहीद भवन बांधावे अशी मागणी संदीप सांगळे त्रिदल सैनिक तालुकाध्यक्ष यांनी केली.

सरपंच सौ शुभांगी ताई जंगले ,यांनी ज्या गावच्या क्रीडांगण पटांगणावर वीर जवान गावचे भूषण मेजर सुभेदार राजेंद्र खुळे यांच्यावर  अंत्यसंस्कार केले, त्या जागेला वीर जवान राजेंद्र पांडुरंग खुळे यांचे नाव देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याचे यावेळी आवर्जून सरपंच सौ जंगले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here