विनामास्क नागरिकांवर दक्षता पथकाकडून कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

विनामास्क नागरिकांवर दक्षता पथकाकडून कारवाई.

 विनामास्क नागरिकांवर दक्षता पथकाकडून कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बालिकाश्रम रोड, बिग बजार, सावेडी, चितळे रोड, लोढा हाइट्स, तेलिखुंट, डाळ मंडई, कापड बाजार, गंजबाजार, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, एकविरा चौंक, श्रीराम चौक येथील दुकाने, बँक, दुचाकी शोरूम इ. ठिकाणांना भेटी देवून महापालिकेच्या दक्षता पथकांनी विनामास्क वावरणार्‍या 74 नागरिकांवर कारवाई करत 14,800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दक्षता पथक प्रमुख राकेश कोतकर, शशिकांत नजान (शहर), सहाय्यक नंदकुमार नेमाणे, सूर्यभान, राहुल साबळे, राजेश आनंद , सूर्यभान देवघडे, अमोल लहारे, अनिल आढाव, भास्कर आकुबत्तीन, रवींद्र सोनावणे, रिजवान शेख यांनी या कारवाईत भाग घेतला. आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांच्या नियंत्रणाखाली सहा पथकांची नियुक्ती केली आहे. सहाय्यक आयुक्त श्री.दिनेश सिणारे, यंत्र अभियंता श्री.परिमल निकम,प्रभाग अधिकारी श्री.नानासाहेब गोसावी,श्री.जितेंद्र सारसर (शहर विभाग) श्री.शशिकांत नजान (शहर विभाग) सांख्यिकी अधिकारी श्री.राकेश कोतकर हे पथक प्रमुख आहेत.

No comments:

Post a Comment