गटविकास अधिकार्‍यांवर बूट फेकला. घटनेमागे राजकीय आकस.. की षडयंत्र? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

गटविकास अधिकार्‍यांवर बूट फेकला. घटनेमागे राजकीय आकस.. की षडयंत्र?

 गटविकास अधिकार्‍यांवर बूट फेकला. घटनेमागे राजकीय आकस.. की षडयंत्र?

बाळासाहेब नाहटांवर गुन्हा दाखल होवून अटक.


श्रीगोंदा -
सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यावर गटविकास अधिकार्‍यांच्या वाहनावर बूट फेकून त्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होवून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा कोणताही व्हिडिओ किंवा साक्षीदार नसल्यामुळे या घटनेमागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.
आमदार बबनराव पाचपुतेंच्या सहकार्याने राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या बाळासाहेब नहाटांचा ‘नाहटा पॅटर्न’ श्रीगोंद्यात बराच गाजला आ. पाचपुतेंशी त्यांचे बिन सल्यानंतर त्यांनी कधी नागवडे गटाशी तर कधी स्वतंत्रपणे राजकारण करत असताना अनेकाशी पंगा घेतल्यामुळे त्यांचे नाव अनेक वादग्रस्त घटनांशी जोडले जात आहे. आता काल जे प्रकरण सुरू झाले आहे तेही विकासात्मक प्रश्नांवरून सुरू झाले आहे. लोणी व्यंकनाथच्या सरपंच यांनी लोणी व्यंकनाथ मध्ये काही विकासात्मक कामे केली आहेत ती शासनाची परवानगी न घेता केली असल्याचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांचे मत आहे. या कामाचा अहवाल काळे यांनी केला असल्यामुळे नाहटा यासंदर्भात जाब विचारण्यासाठी आले असताना हा वाद झाला असल्याचे समजते लोणी व्यंकनाथ चे सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव काळे यांनी तयार केला असून नाहटा यांनी या अहवालास विरोध केला आहे.
गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी काल नाहटांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली फिर्यादीत असे म्हटले आहे की, आज दुपारी पंचायत समितीच्या शासकीय सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी जात असताना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा तिथे आले. त्यांनी माझ्या हातात कागद देत लोणी व्यकनाथ ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई करणार का असे विचारले असता हो त्यांच्यावर आपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगताच नाहटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी करण्यास सुरुवात केली. तिथून गटविकास अधिकारी काळे हे पंचायत समिती कार्यालयातून बाहेर पडत शासकीय गाडीत बसत असताना पुन्हा नाहटा यांनी काळे यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान पंचायत समिती कर्मचार्‍यांनी नाहटा यांना आवरत बाजूला नेले. त्याच दरम्यान गटविकास अधिकारी काळे हे शासकीय वाहनात बसत असताना नाहटा यांनी त्यांच्या पायातील बूट काढत गटविकास अधिकारी काळे यांच्या दिशेने भिरकावला. फेकून मारलेला बूट वाहनाच्या काचेवर लागला असल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. नाहटा यांनी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यावर बूट फेकून मारल्याची घटना घडल्यानंतर ही बातमी सामाजिक माध्यमांमधून तालुक्यात पसरली. नाहटा विरोधकांनी हीच संधी साधत तात्काळ गुन्हा दाखल कसा होईल यासाठी वेगवान हालचाली केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

आपण गटविकास अधिकारी प्रशांत काळे याना फक्त तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या कामाबाबत जाब विचारला त्याचा राग आल्याने ते पोलीस ठाण्यात गेले. याच संधीचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना चौदा फोन करून गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला. हा नेता कोण त्याचे काय कारनामे आहेत हे बाहेर आल्यावर उघड करणार आहोत. राजकीय आकषातून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - बाळासाहेब नाहाटा, माजी सभापती.

No comments:

Post a Comment