समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महिला व बालकांवर होणा-या अत्याचारास प्रतिबंध करुन त्यांना संरक्षण, मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. जिल्हयातील कर्जत-जामखेड या तालुक्यांच्या ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र सुरु करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून महिला व बाल विकास विभाग प्रस्ताव मागवित आहे. संबंधीत तालुक्यातील तसेच महिला पदाधिकारी असलेल्या संस्थेस प्राधान्य देण्यात येईल. एका संस्थेस एकापेक्षा जास्त केंद्र मंजूर करण्यात येणार नाही. संस्थेची निवड एक वर्षाची असेल व काम समाधानकारक असल्यास पुढे मुदतवाढ देण्याचा विचार देण्यात येईल.

No comments:

Post a Comment