तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अण्णांना अपेक्षित असलेला समाज घडेल ः वाजे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अण्णांना अपेक्षित असलेला समाज घडेल ः वाजे

 तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अण्णांना अपेक्षित असलेला समाज घडेल ः वाजे

पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाजेवाडी वडनेर बु. येथे वृक्षापरो


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा करण्याचे पेव फुटलेले असताना वाजेवाडीकर तरुण अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण करून त्यांना शुभेच्छा देत आहेत हे कौतुकास्पद आहे. तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अण्णांना अपेक्षित समाज नक्की घडेल असा मला विश्वास आहे असे मत वडनेर बु ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रमेश वाजे यांनी व्यक्त केले. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाजेवाडी वडनेर बु. येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. मागील दोन वर्षांपासून परिसरात वृक्षारोपण केले जात आहे आणि त्यातील जवळपास 90 टक्के वृक्ष टिकले आहेत. आश्वासक विकास करायचा असेल तर निसर्ग टिकला पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.
स्मशानभूमीतील राख पाण्यात न सोडता मृत व्यक्तीच्या नावाने स्मृतीवृक्ष लागवड करण्याचा दिशादर्शक उपक्रमही वाजेवाडीकरांनी सुरू केला आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.यावेळी आनंदतात्या वाजे, दशरथ बोचरे, संतोष वाजे, संदीप वाजे, संतोष बोचरे, प्रदीप बोचरे, देवा बोचरे, अक्षय बोचरे संदेश उंडे, सुदर्शन बोचरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment