कोरोना काळात शेकडो भटके-विमुक्त आणि एकल महिलांना महाजन यांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

कोरोना काळात शेकडो भटके-विमुक्त आणि एकल महिलांना महाजन यांची मदत

 कोरोना काळात शेकडो भटके-विमुक्त आणि एकल महिलांना महाजन यांची मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः अ‍ॅड. विंदा ताई महाजन , पुणे यांच्या प्रयत्नातून आणि सेवा फाउंडेशन व बिईंग व्हॉलींटीयर्स यांच्या सहकार्याने ग्रामीण विकास केंद्र, जामखेड या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लोणी व्यंकनाथ येथील सहा आदिवासी पारधी कुटुंब आणि कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील 34 गरजू कुटुंबांना महिनाभराचे किराणा किट देण्यात आले.
तसेच मागील आठ दिवसात विंदाताई महाजन यांनी ग्रामीण विकास केंद्र, जामखेड या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील विविध वाड्या-वस्त्या व पालावर जाऊन  महिनाभर पुरेल असे किराणा किट पोहोच केले आहेत.
ऍड.विंदाताई महाजन महिलांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना कायदेविषयक सल्ला आणि मदत नेहमीच करत असतात. या कोरोना काळाच्या भयंकर परिस्थितीत लॉक डाऊन पडले असताना भटक्या जाती-जमाती तसेच एकल महिलांचे होत असलेले हाल ताईंना जाणवले आणि त्यामुळे स्वतःच पुढे येत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फंड जमवून महाराष्ट्रातील भटक्या समूहाच्या वाड्या-वस्त्यांवर किराणा किट्स पोचवण्यात सुरुवात केली. पुणे, सोलापूर, इंदापूर, वाशिम, अमरावती जिल्यातील अनेक वस्त्यांवर त्यांच्या मदतीने किराणा किट्सचे वाटप झाले आहे. तसेच काही संस्थांच्या व ग्रुप्सच्या मदतीने शिरूर, ढोकराई, लोणी व्यंकनाथ, मुळशी या भागातही वाटप केले आहे. ऍड. विंदाताई स्वत: भटक्या आणि आदिवासी भागातील वाड्या - वस्त्यांवर जाऊन किराणा थेट प्रत्येकाच्या हाती पोहोच करत आहेत. ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेचे स्थानिक कार्यकर्ते काजोरी पवार आणि  श्रीगोंदा तालुका समन्वयक संतोष भोसले यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले, अशी माहिती लोकाधिकार आंदोलन या संघटनेचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment