करोना काळात आ.जगताप यांनी अडचणीत सापडलेल्यांना भक्कम आधार दिला : अनिल पोखरणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

करोना काळात आ.जगताप यांनी अडचणीत सापडलेल्यांना भक्कम आधार दिला : अनिल पोखरणा

 करोना काळात आ.जगताप यांनी अडचणीत सापडलेल्यांना भक्कम आधार दिला : अनिल पोखरणा

ए.एच.पोखरणा ज्वेलर्सच्यावतीने आ.संग्राम जगताप यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मागील दोन तीन महिने नगरकरांनी करोना महामारीचे महाभयंकर रूप अनुभवले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नाईलजास्तव बंद ठेवावी लागली. या कसोटीच्या काळात आ.संग्राम जगताप यांनी सर्वसामान्यांपासून व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्याचे काम केले. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धीर देताना अडचणीत सापडलेल्यांना भक्कम आधार दिला. शहरातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांचेही प्रश्न प्राधान्याने सोडवले. आ.जगताप यांच्या रुपाने हक्काचा लोकप्रतिनिधी नगरकरांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन ए.एच.पोखरणा ज्वेलर्सचे संचालक तथा अहमदनगर मर्चंटस् बँकेचे चेअरमन अनिल पोखरणा यांनी केले.
ए.एच.पोखरणा ज्वेलर्सच्यावतीने सर्जेपुरा येथील नूतन प्रशस्त व भव्य दालनात आ.जगताप यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून अमित पोखरणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, वसंत पोखरणा, प्रकाश पोखरणा, रवींद्र गुजराथी, संजय मुनोत, प्रशांत बल्लाळ, अमित पोखरणा, नयन पोखरणा आदी उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले की, करोना काळात शहरातील बाजारपेठ बंद ठेवावी लागली. महामारीचे संकट ओळखून व्यापारी वर्गानेही शासन, प्रशासनाच्या निर्णयांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर नगरच्या सामाजिक संघटना, व्यापारी बंधूंनी करोना काळात स्वेच्छेने अनेक उपक्रम राबवून अडचणीत सापडलेल्यांना मदत केली. अशा एकजूटीमुळेच आता नगरची करोनामुक्तीकडै वाटचाल होत आहे. पोखरणा परिवार सुवर्णव्यवसायात सोन्यासारखी सेवा देतानाच सामाजिक बांधिलकीही जपत आलेला आहे. या परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत, असे आ.जगताप म्हणाले.

No comments:

Post a Comment