नेवासे कृषी विभागाने पेरणीपुर्व बिजप्रक्रीयेबाबत केले मार्गदर्शन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

नेवासे कृषी विभागाने पेरणीपुर्व बिजप्रक्रीयेबाबत केले मार्गदर्शन

 नेवासे कृषी विभागाने पेरणीपुर्व बिजप्रक्रीयेबाबत केले मार्गदर्शन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः नेवासे तालुक्यातील माका,महालक्ष्मी हिवरे या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने,शेतकरी वर्गा तून कमीत कमी खर्चात कुठल्याबाबतीत पिक घ्यावे, तसेच शेतपिकाबाबत पिवळं सोनं म्हणुन ओळखल्या जा णारयां सोयाबीन पीकासंदर्भात मशागतीसाठी व बिज प्र क्रियाबाबत,पिकास योग्यप्रमाणात खतपाणी संबधित मार्गदर्शन नेवासे तालुका कृषीअधिकारी दत्तात्रय डमाळे तसेच घोडेगाव मंडल कृषीअधिकारी आर.एस.ढोकणे यां च्या मार्गदर्शनाखाली कृषीसहाय्यक रुपेश पवार यांनी म. ल.हिवरेचे शेतकरी रामचंद्र पंढरीनाथ केकाण यांच्याशेती त पेरणी करण्याचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.          याबाबत असे की,सोयाबीन पिकासंदर्भात कमीतकमी खर्चात जास्त उत्पन्न घेणे तसेच शेती आधुनिक पद्धतीने करणे,याबाबत भुसभूशीत शेती,रुंद वरंबा,सरीपद्धती,सरी पद्धतीने पिकासं योग्य प्रमाणात पाणी,हवा सुर्यप्रकाश मिळण्याची गरज व फायदे,सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, दहावर्षाआतील सुधारित बियाण्याची निवड,पेरणीसाठी एकरी पंचवीस किलो बियाणांचा वापर,तसेच शेत प्रमाणा त बियाणांचावापर,बुरशीनाशक,किटकनाशक,तणनाशक, चार ते पाच से.मी.वरतीच पेरणीबाबतीत माहिती,रोगनियं त्रण संबधित औषधे,यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.     याप्रसंगी कृषीमित्र सुभाष गाडे,आदिनाथ सानप,अंबा दास पुंड,संजय सानप,अक्षय पालवे,पंडित आव्हाड, राधु सानप, पोपट आव्हाड, दिनकर गंगावणे,आण्णा साहेब के दार,जगन्नाथ गायके,कैलास आव्हाड,रावसाहेब गायके, संजय गायके,नागनाथ गायके,सुरेश सानप,अरुण बोरुडे, भाऊसाहेब रणबावरे,आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment