राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत आयुष कार्लेची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत आयुष कार्लेची निवड

 राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत आयुष कार्लेची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
केडगांव येथील भाग्योदय विद्यालयाचा इ.10 वी चा विद्यार्थी आयुष सुरेश कार्ले याची राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा (एनटीएस)मध्ये प्रथम लेव्हल मध्ये 160 गुण मिळवून गुणवत्ता यादीत त्यांची निवड झाली. या निवडीनंतर पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
चि. आयुष कार्ले यास प्राचार्य ज्ञानदेव बेरड, विभागप्रमुख संजय गोसावी, बाबासाहेब कोतकर,  पोपट येवले, धनंजय बारगळ, सोपान तोडमल, एकनाथ होले आदिंचे मार्गदर्शन लाभले. त्याचे रघुनाथ लोंढे, मार्गदर्शिका वैशालीताई कोतकर आदिंनी अभिनंदन करुन त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. चि.आयुष हा शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांचा तो मुलगा आहे.  त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment