रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा- अ‍ॅड. सुरेश लगड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा- अ‍ॅड. सुरेश लगड

 रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा- अ‍ॅड. सुरेश लगड


अहमदनगर ः
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जरे यांची दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला असून पत्रकार बाळ ज. बोठे याने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पोलिसांनी बोठेसह इतर आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेची निर्घृण हत्या होणे ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, असे अ‍ॅड. लगड यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment