‘क्रेडाई’च्या पुढाकारातून शहरात व्यापक वृक्ष लागवड अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

‘क्रेडाई’च्या पुढाकारातून शहरात व्यापक वृक्ष लागवड अभियान

 ‘क्रेडाई’च्या पुढाकारातून शहरात व्यापक वृक्ष लागवड अभियान


अहमदनगर ः
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई अहमदनगर, क्रेडाई युथविंग, क्रेडाई वूमन्स विंग यांच्या संयुक्त विदयमाने वृक्ष लावण्याचा महत्वकांक्षी  उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ केडगाव लिंक रोडवरील स्वप्नपूर्ती शुभवास्तू रियालिटी परिसरात करण्यात आला. बांधकाम करत असताना झालेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हास भरून काढणे, विविध स्थानिक वृक्षांबद्दल जागरूकता वाढवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष अमित मुथा, उपाध्य्क्ष गिरीश अग्रवाल, सागर गांधी, सचिव अमित वाघमारे, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव संजय गुगळै, प्रसाद आंधळे, दिपक बांगर, आशिष पोखर्णा, गौरव पितळे, राहुल अडसुरे, नरेंद्र  बाफना, प्रकाश मेहता, सतीश पागा, विक्रम जोशी, तसेच क्रेडाई वूमन्स विंगचे सोनाली मुथा, शर्मिला गुगळे, लीना वाघमारे, राजश्री आंधळे, श्रद्धा अडसुरे, मंजुश्री मुथा, साक्षी मुथा, रिद्धी पितळे तसेच क्रेडाई युथविंगचे शिवांग मेहता, मयूर राहिंज, तुषार लोढा, नितेश गुगळे, निधीश पितळे आदी उपस्थित होते. या उपक्रमास लँडस्केप आर्किटेक्ट मयुरेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाविषयी क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा म्हणाले कि, क्रेडाईच्यावतीने अहमदनगर शहरात वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. बहावा, करंज, कदंब, कांचन, ताम्हन, बकुल, शिरीष, वड, पिंपळ, गुलमोहर, सुबाभूळ आदी सावली देणार्‍या व जास्त काळजी न लागणार्‍या मोठ्या रोपांचा या वृक्षरोपणात प्रामुख्याने समावेश केला.

No comments:

Post a Comment