आ.जगताप यांचे हिंद सेवा मंडळास कायम मोलाचे सहकार्य व मदत : जोशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

आ.जगताप यांचे हिंद सेवा मंडळास कायम मोलाचे सहकार्य व मदत : जोशी

 आ.जगताप यांचे हिंद सेवा मंडळास कायम मोलाचे सहकार्य व मदत : जोशी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 100 वर्षाचा वैभवशाली व ऐतिहासिक वारसा असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या शैक्षनिक संस्थांमधून  सर्वसामन्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे काम चालू आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधांयुक्त दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हिंद सेवा मंडळ कटीबद्ध आहे. या कार्यात संस्थेस आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप या आमदार द्वियांचे कायम मोलाचे सहकार्य असते. कार्यतत्पर व मदतशील आमदार म्हणून आ.संग्राम जगताप यांची आळोख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व मानद सचिव संजय जोशी यांनी त्यांचे अभीष्टचिंतन करून करोना काळात त्यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल सत्कार केला. यावेळी कर्याध्यक्ष अजित बोरा, दादाचौधरी विद्यालायचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, जेष्ठ संचालक रणजीत श्रीगोड, हेमंत गोखले, अधिक जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्याध्यक्ष अजित बोरा म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या शाळांना आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी वेळोवेळी निधी देवून भरपूर सहकार्य केले आहे. कायम सहकार्य करणारे आ,संग्राम जगताप यांचे अभीष्टचिंतन करताना आनंद होत आहे. यावेळी सिमातीलाल कोठरी यांनीही भाषांतून आ.संग्राम जगताप यांचे कार्याचे कौतुक केले. आ.संग्राम जगताप यांनी सत्कारास उत्तर देताना मंडळाच्या शैक्षणीक कार्याचे कौतुक करत कायम सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment