शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर

 शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर

खुल्या गटातून सोनाली बंडगर प्रथम तर प्रविण आटोळे द्वितीय

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान श्रीक्षेत्र वाहिरा ता.आष्टी आयोजित राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
ही स्पर्धा लहान गट, मोठा गट, महाविद्यालयीन गट, खुला गट अशा चार विभागात आयोजित करण्यात आली होती. वयोगटानुसार विषय देण्यात आले होते. मी लढणार कोरोणाशी, वृक्षारोपण काळाची गरज, माझ्या स्वप्नातील आदर्श गाव, अहिल्यादेवींचे सामाजिक कार्य, मी शाळा बोलते, कोरोनाशी लढाई आणि माझी जबाबदारी, तरुणाई पुढील आव्हाने, स्री शक्ती जागी व्हावी, संत शेख महंमद महाराज साहित्य कार्य विचार असे वेगवेगळे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी भाषण पाठविले होते. सर्वच स्पर्धकांचे भाषण उत्कृष्ट श्रवणीय होते. या स्पर्धेचा निकाल 31 मे रोजी  अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त लागला. यात लहान गटातून श्लोक वेंगुर्लेकर, श्रेया एकशिंगे, शिंदे पद्मनाभेश्वरी, कृष्णाली शेलार, आर्यन जामदार, ईश्वरी आटोळे  तर मोठ्या गटातून मोनिका अनभुले, अंजली मगर, साक्षी बंडगर, श्रद्धा भंडारी व महाविद्यालयीन गटातून पदमिना राऊत, वैष्णवी कोरडे तसेच खुल्या गटातून सोनाली बंडगर व प्रवीण आटोळे यांनी यश संपादित केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सचिव कवी किसन आटोळे, अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज , श्री सोमनाथ शेलार सर , श्री सदाशिव पगारे सर, श्री दत्ता झांजे सर, श्री इंद्रकुमार झांजे सर, श्री.सतीश आटोळे यांनी परिश्रम घातले.  सहभागी स्पर्धकांचे व यशस्वी स्पर्धकांचे  वाहिरा ग्रामस्थांनी व सोशल मिडीयावरील मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment