बेलवंडी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून भरघोस निधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

बेलवंडी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून भरघोस निधी

 बेलवंडी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून भरघोस निधी

इयत्ता 10 वी मधील रोहित आणि ऋतुजा किसनराव वर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त किसनराव वर्‍हाडे यांनी विद्यालयास 5000 रुपयांची देणगी प्राचार्य संपतराव पवार यांच्याकडे सुपूर्त केली.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास येत असताना या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 2 लाख 57 हजार 468 रुपयांचा निधी रयत शिक्षण संस्थचे उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर,शालेय स्कुल कमिटीचे सदस्य तात्यासाहेब हिरवे, प्राचार्य संपतराव पवार यांच्या ताब्यात सुपुर्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या बेलवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास येत असताना या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी विद्यालयाच्या एस.एस.सी च्या मार्च 1993 बॅचच्या वतीने 53हजार618 रुपये , मार्च 1997  बॅच च्यावतीने 70 हजार रुपये , मार्च 1998 बॅच च्या वतीने 22 हजार 600 रुपये ,मार्च 2000 बॅच च्या वतीने 75 हजार रुपये, तर मार्च 2001 बॅच च्या वतीने 36 हजार 250 रुपयांचा निधी जमा करून तो निधी रयत शिक्षण संस्थचे उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर,शालेय स्कुल कमिटीचे सदस्य तात्यासाहेब हिरवे, प्राचार्य संपतराव पवार यांच्या ताब्यात सुपुर्त केले. यावेळी समता पतसंस्थेचे चेअरमन सुनील ढवळे, आबासाहेब धनवडे, व्यापारी पतसंस्थेचे मॅनेजर किसनराव वर्‍हाडे, अनिल काळे, संतोष भोसले, गणेश हिरवे, धनंजय वाजे, काशिव काळाने, विजय घोडेकर, संतोष काळाने,विलास काळाने, विजय काळाने, विद्यालयातील सेवक वर्ग उपस्थित होते, पर्यवेक्षक पंढरीनाथ कोकाटे यांनी देणगीदारांचे व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment