वृक्षारोपण अभियानाने गड व डोंगररांगाना निसर्गाचे गत वैभव प्राप्त होणार ः आजिनाथ महाराज शास्त्री - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

वृक्षारोपण अभियानाने गड व डोंगररांगाना निसर्गाचे गत वैभव प्राप्त होणार ः आजिनाथ महाराज शास्त्री

 वृक्षारोपण अभियानाने गड व डोंगररांगाना निसर्गाचे गत वैभव प्राप्त होणार ः आजिनाथ महाराज शास्त्री

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा उपक्रम तारकेश्वर गडावर माजी सैनिकांनी लावले सहाशे झाडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांची वृक्ष रोपण व संवर्धनाची मोहिम सुरु आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात डोंगर रांगा व गडांवर वृक्षरोपणचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, नुकतेच तिर्थक्षेत्र तारकेश्वर गड (ता. पाथर्डी) येथे शंभर वडाची व पाचशे महोगणी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.
या अभियानाचे प्रारंभ गडाचे महंत ह.भ.प. आजिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सभापती विष्णुपंत अकोलकर, नवनाथ आव्हाड, पंचायत समिती सदस्य सुनिल ओव्हळ, निवृत कर्नल सर्जेराव नागरे, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, सरपंच देविदास दहिफळे, समाजसेवक फुंदे सर, सुष्मा ढाकणे, बालाजी प्रतिष्ठानचे संतोष आव्हाड, स्नेह सावलीचे अमर हजारे, जमिर शेख, बंडू पठाडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, शिवाजी गर्जे, अनिल ससे, शैलेंद्र पांढरे, सचिन दहिफळे, गणपती दहिफळे, दिनकर डमाळे, आजिनाथ पालवे, नवनाथ पालवे, विष्णू गिते, दिनकर पालवे, शर्मा पालवे, पोपट पालवे, कारभारी तांदळे, सुभाष पालवे, आंबादास पालवे, रामकृष्ण काकडे, म्हातारदेव मुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ह.भ.प. आजिनाथ महाराज म्हणाले की, माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी जिल्ह्यातील गड, डोंगर माथ्यावर सुरु केलेल्या वृक्ष रोपण अभियानाने गड व डोंगरांना निसर्गाचे गत वैभव प्राप्त होणार आहे. सजीव सृष्टीस ऑक्सिजन आवश्यक असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्याने सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वृक्षरोपण काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पालवे म्हणाले की, भविष्यात तारकेश्वर गड हिरवाईने नटणार आहे. ऑक्सिजन कृत्रिमरित्या बनवता येत असले तरी, त्याचे मुख्य स्त्रोत झाडेच आहेत. झाडे कमी झाल्यास ऑक्सिजन अभावी सजीव सृष्टी धोक्यात येणाची शक्यता आहे. काळाची पाऊले ओळखून सर्वांनी या वृक्षरोपण मोहिमेत हातभार लावण्याची गरज आहे. तर एक व्यक्तीने एक झाड लावून ते जगविण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार संतोष मगर यांनी मानले.

No comments:

Post a Comment