सारसनगर व बुरुडगावरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

सारसनगर व बुरुडगावरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा

 सारसनगर व  बुरुडगावरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा

प्रकाश भागानगरे यांचा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  सारसनगर व बुरुडगाव रोड परिसरातील काही भागात गेल्या पंधरा दिवसापासून मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मनपा प्रशासनाला सूचना देऊनही कुठल्याही उपाययोजना झाल्या नाही, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे साथीचे आजार पसरत असतात यासाठी लवकरात-लवकर पाईपलाईन दुरुस्त करून होणारा दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा येत्या काही दिवसात महापालिके मध्ये ठिय्या आंदोलने करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक गणेश भोसले, मा.नगरसेवक संजय चोपडा यांनी दिला आहे. आज अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापालिकेत संपन्न झाली यासर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक प्रकाशन भागानगरे यांनी सारसनगर व बोरूडगाव रोड परिसरात होणार्‍या दूषित पाण्याबाबत आवाज उठवित निवेदन दिले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here