गौन खनिज कायद्याचा भंग, डंपरने मुरमाची वाहतूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

गौन खनिज कायद्याचा भंग, डंपरने मुरमाची वाहतूक.

 गौन खनिज कायद्याचा भंग, डंपरने मुरमाची वाहतूक.

नगर तालुका तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील भोरवाडी मधील चास शिवारातील गट नं. 364, 369 मधून चास मधील वाळू ठेकेदार नवनाथ गोंडाळ यांचे संगनमताने उल्हास बाप्पू भोर याने 300 ते 400 डंपर विनापरवाना मुरूम काढून गौन खनिज कायद्याचा भंग केला असल्याची तक्रार या जमिनीच्या मालक शकुंतला भोर, उज्वला भोर यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली असून या दोन्ही व्यक्तींवर कार्यवाहीची मागणी केली आहे.
तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमची जिरायती शेत जमीन, गाव-भोरवाडी ता.जि.अहमदनगर चास शिवरासलागून गट नं. 364 व 369 असे दोन्ही गट आहेत. हे दोन गटाचे सातबारा उतारा अर्जासोबत जोडत आहे. याठिकाणी उल्हास बापू भोर याने चास गावामधील जेसीबी व डंपर या वाहनाद्वारे नवनाथ गोंडाळ यांच्या संगनमताने मुरूम वाहतूक केली.  गोंडाळ हा चास मधील रहिवासी आहे. हा वाळूचा व्यवसाय करितो, याच्या संगनमताने यांनी जवळजवळ 300 ते 400 डंपर हायवा मुरूम वाहतूक केली. गौन खनिज कायदा 3 व 4 कलम शासनाची परवानगी न घेता व मालकी हक्क नसताना मानडू एन्ड क्रिमिनल ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळावी व त्याच्यावर कायद्यानुसार कार्यवाही करावी व ठिकाणी मुरूम टाकला त्याचा साठा जप्त करावा व कायद्यानुसार कार्यवाही करावी. असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment