अमृत भुयारी गटर योजनेचा केंद्राकडे प्रस्ताव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

अमृत भुयारी गटर योजनेचा केंद्राकडे प्रस्ताव.

 अमृत भुयारी गटर योजनेचा केंद्राकडे प्रस्ताव.

स्थायी सभापती अविनाश घुलेंनी घेतली बैठक..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भुयारी गटर योजनेच्या माध्यमातून मैलमिश्रीत पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे आपल्या सिनानदीत होणारे प्रदुषण थांबणार आहे. यासाठी संपूर्ण शहरामध्ये अमृत भुयारी गटर योजनेचे काम मार्गी लागावे यासाठी पाऊले उचलली आहेत. उर्वरित नगर शहराच्या उपनगरामध्ये या योजनेच्या कामाला निधी प्राप्त होण्यासाठी कागदपत्राची जुळवा जुळव करून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाईल व दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला गती दिली जाईल यामध्ये केडगांव, सावेडी उपनगर, कल्याण रोड उपनगर, नागापूर, बोल्हेगांव, निर्मलनगर परिसरातील भुयारी गटर योजनेची कामे मार्गी लागली जातील. या योजनेचे कामे मार्गी लागण्यासाठी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले जाणार असल्याची माहिती स्थायीचे सभापती अविनाश घुले यांनी दिली.
स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले यांनी मनपा प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  व युनिर्टी कंन्सल्टन्शी पुणे यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
घुले यावेळी म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून अहमदनगर शहराला अमृत भुयारी गटर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी वर्ग झाला असून हे काम जुन्या गांवठाण भागात सुरू असून 30 जून पर्यत या कामाच्या कालखंडाची मुदत असून डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार आहे. दुस-या टप्प्यातील सुमारे 450 कि.मी.च्या उपनगराच्या डीपीआर मध्ये वाढीव हद्दीचा सर्वे केलेला आहे. त्याठिकाणी 150 एमएम वरून 200 एमएम चे पाईप करण्या संदर्भाचा नविन डीपीआर मंजूरीसाठी केंद्र सरकारला सादर करावयाचा आहे.
यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते मा.श्री.संपत बारस्कर, सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्कर, उपायुक्त श्री.यशवंत डांगे, नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे, मा.श्री.मनोज दुलम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, मा.श्री.सुमित कुलकर्णी, मा.श्री.विनोद कुरणपट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे श्री.अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment