तत्कालीन आयुक्त, नगररचनाकारांनी पदाचा दुरुपयोग केला. शिस्तभंगाची कार्यवाही करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

तत्कालीन आयुक्त, नगररचनाकारांनी पदाचा दुरुपयोग केला. शिस्तभंगाची कार्यवाही करा.

 तत्कालीन आयुक्त, नगररचनाकारांनी पदाचा दुरुपयोग केला. शिस्तभंगाची कार्यवाही करा.

‘सुरभी हॉस्पिटल’च्या बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ते शेख यांचे नगर रचना विभागाला निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुरभी हॉस्पिटलचे बांधकामासाठी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाकडून प्रत्यक्षात सदर इमारतीच्या सामासिक अंतरामधून अग्निशमन वाहन जाऊ शकते का याची चाचणी घेण्यात आलेली नाही. व या इमारतीलगत सुरभी हॉस्पिटल या नावाने जूनी इमारत असून त्या इमारती एकमेकांशी पूलाच्या सहाय्याने जोडल्या आहेत. ही बाब राष्ट्रीय इमारत संहितेचे उल्लंघन करणारी आहे. या इमारतीची जागा मालक सय्यद फय्याज हाजी मीर अजीमोद्दीन कविजंग जहागिरदार यांच्या मालकीची असून त्यांनी इमारत सुरभी हॉस्पिटल प्रा. लि. यांना भाडेतत्वावर दिलेली आहे. अहमदनगर महानगरपालिकेने संकलीत कर आकारणी करताना मूळ भाडे कराराच्या आधारीत संकलीत कर आकारणी करून तरतूदींचे उल्लंघन करुन तत्कालिन आयुक्त श्रीकांत मायकेलवार व नगररचनाकार राम चारठाणकर यांनी पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन वरीलप्रमाणे बेकायदेशीर कृती केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी होऊन बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी व श्री मायकेलवार व श्री. चारठाणकर यांची चौकशी होऊन त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर भाई शेख यांनी नगर विकासाचे प्रधान सचिव यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेख यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे सावेडी, स.नं. 87 अ. प्लॉट नं. 1+10 या मिळकतीत सुरभी हॉस्पिटलचे बांधकाम करण्यासाठी मिळकतधारक सय्यद फय्याज हाजी मीर अजीमोद्दीन कविजंग जहागिरदार यांनी अर्ज करुन बांधकाम परवानगी मिळण्याबाबत अर्ज केला असता त्या अनुषंगाने सहाय्यक संचालक, नगररचना विभाग यांनी जा.क्र. डी. डी. एम. सी. एन. / आर. बी. / 2020/एपीएल / 00113 ता. 22/12/2020 या अन्वये परवानगी दिली व बांधकामच्या नकाशास मंजूरी दिलेली आहे. मंजूरी देताना ड वर्ग महानगरपालिकेकरीता शासनाने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या तरतूदींचे उल्लंघन करुन मंजूरी दिलेली आहे.
नियम क्र. 6.2.2स(ळ) फक्त विशेष इमारतीस 16 मी. उंचीपर्यंत परवानगी देण्यात येते प्रत्यक्षात सदर इमारतीची उंची ही 24.0 मी. असून ड्रॉईंगमध्ये ती 22.70 मी. इतकी दाखविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात सदर नियमाचे उल्लंघन करुन परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच दोन विशेष इमारतीमधील सामासिक अंतर हे नियम क्र. 26.2.2 टेबल नं. 9अ. अ. नं. 1 अ प्रमाणे सर्व बाजूंनी 6 मीटर सोडणे आवश्यक आहे असे असताना प्रत्यक्षात सामासिक अंतराचे अनुपालन केलेले नाही. आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यावर अग्निशमन वाहन चारही बाजूने जाण्यासाठी अंतर असणे आवश्यक आहे असे असतानाही त्याचे पालन झालेले नाही.नियमातील टेबल नं. 14 ब अट क्र. (ळळ) (ळळ). ( र्ळीं) नुसार इमारतीमधील स्पेशल रुमचे क्षेत्र 9 चौ. मी. व त्याची कोणतीही बाजू ही 3 मी. पेक्षा कमी असू नये. प्रत्यक्षात पहिल्या व चौथ्या मजल्यावर नियमाचे उल्लंघन करून परवानगी दिलेली आहे. 5 तसेच र्(ींळ) प्रमाणे रिफ्यूज कलेक्शन क्षेत्र हे किमान 7.50 चौ.मी. असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात त्याप्रमाणे क्षेत्र नाही. र्(ींळळ) मॅझेनीन फ्लोअर छखउण झखउण मध्ये किमान उंची 3 मीटर असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात ती कमी आहे.
साईड मार्जिनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसताना रॅम्पचे बांधकामास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अग्निशमन वाहन किंवा अँब्युलन्स वाहतूकीस अडथळा निर्माण होणार आहे. नियम क्र. 26.8 रॅम्पसाठी (इ) प्रमाणे 60 मी. अंतर असणे आवश्यक असताना समासिक अंतरामध्येच रॅम्प केलेला आहे व त्यास परवानगी दिली आहे. नियम क्र. 41.12ब प्रमाणे रॅम्प हा 30 मी + 30 मी. रुंदीने असे दोन किंवा 6.0 मी. रुदीचा एक असणे आवश्यक आहे या तरतूदीचे उल्लंघन झालेले आहे. राष्ट्रीय इमारत संहितेच्या तरतूदीनुसार 15 मी. पेक्षा उंच इमारतीकरीता दोन स्वतंत्र जीने बंधनकारक असताना सदर इमारती उंची 24 मी. असताना तेथे एकच जीना प्रत्यक्षात केलेला आहे. जर आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्ण व कर्मचारी यांना बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment