लघुकथा संशोधन केंद्रामुळे हिंदी भाषेला महत्त्व येईल ः प्रा. कुरणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

लघुकथा संशोधन केंद्रामुळे हिंदी भाषेला महत्त्व येईल ः प्रा. कुरणे

 लघुकथा संशोधन केंद्रामुळे हिंदी भाषेला महत्त्व येईल ः प्रा. कुरणे

अहमदनगरमध्ये लघुकथा शोध केंद्राचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगरमध्ये लघुकथा संशोधन केंद्र स्थापनेमुळे हिंदी भाषेला ही महत्त्व प्राप्त होईल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविद्या शाखेच्या अधिष्ठाता प्रोफेसर डॉ अंजली कुरणे यांनी केले.  भोपाळ येथील लघुकथा शोध केंद्रच्या महाराष्ट्र राज्यातील शोध क्रेदाची शाखा अहमदनगर मध्ये सुरू करण्यात आली . त्याचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रोफेसर अंजली कुरणे बोलत होत्या. हा कार्यक्रम गूगल मिटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ सदानंद भोसले हे होते.
या वेळी लघुकथा संशोधन केंद्र, भोपाळच्या संचालिका श्रीमती कांता रॉय, अहमदनगर लघुकथा संशोधन केंद्रच्या संयोजिका प्रोफेसर डॉ ऋचा शर्मा, देशातील वेगवेगळ्या राज्यातील साहित्यिक, हिंदी प्रेमी सहभागी झाले होते.
अहमदनगर लघुकथा संशोधन केंद्रच्या संचालिका व अहमदनगर महाविद्यालय , अहमदनगरच्या हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ ऋचा शर्मा यांनी  प्रास्ताविकात स्पष्ट केले कि लघुकथा  एक स्वतंत्र साहित्य प्रकाराची ओळख निर्माण व्हावी आणि शिखरावर पोहचविण्यासाठी आम्ही अहमदनगर येथे लघुकथा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील लघुकथा लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
लघुकथा संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण भारतवर्षाला एका धाग्यात बांधायचे आहे असे विचार भोपाळच्या लघुकथा संशोधन केंद्र संचालिका श्रीमती कांता रॉय यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्रोफेसर डॉ सदानंद भोसले म्हणाले कि  महाराष्ट्राची पार्श्वभूमी बहुआयामी आहे. महाराष्ट्राच्या लघुकथांचे सार्वकालिक रूप हे मानवी जीवनाशी निगडित आहे.  लघुकथांमधून हे घडवून आणता येते.
डॉ   संध्या खंडागळे ने कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. डॉ अंजली कुरणे आणि प्रा. आनंद त्रिपाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रा. डॉ सदानंद भोसले यांची ओळख करुन दिली. अहमदनगर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी चेतन रावेलिया यांनी हा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. लॉ ची विद्यार्थिनी आस्था शर्मा ने तांत्रिक सहाय्यक केले

No comments:

Post a Comment