अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त तरडगावमध्ये नारी सन्मान योजनेची घोषणा ः सौ. केसकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त तरडगावमध्ये नारी सन्मान योजनेची घोषणा ः सौ. केसकर

 अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त तरडगावमध्ये नारी सन्मान योजनेची घोषणा ः सौ. केसकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीने नारी सन्मान योजनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा तरडगावच्या सरपंच संगीता केसकर यांनी केली.
सोमवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती कोरोना प्रतिबंधक सर्व नियम व अटी पाळून अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी तरडगाव चे सरपंच संगीता केसकर, उपसरपंच बारकाबाई देवमुंडे, वैजिनाथ केसकर, तरडगाव चे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल बरबडे, ग्रामपंचायत सदस्य दराबाई केसकर, पिंटू देवमुंडे, मोहन केसकर, भरत देवमुंडे, भागवत केसकर, शरद देवकाते, नाना केसकर, युवराज केसकर, अप्पा खटके, बबन हजारे, अभिमान शेंडकर, चंद्रकांत केसकर  आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
तरडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये दि. 31 मे पासून जन्माला येणार्‍या मुलींच्या नावे तरडगाव ग्रामपंचायत च्या वतीने 5 हजार रुपयांची रक्कम टाकण्यात येणार आहे. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या भविष्यातील शैक्षणिक व इतर खर्चासाठी ही रक्कम उपयोगी पडेल. अशी ही कल्याणकारी योजना आहे. त्यामुळे मुलगी वाचली तर गाव वाचेल अशी प्रतिज्ञा करून स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे सरपंच संगीता केसकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच संगीता केसकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वैजिनाथ केसकर व ग्रामसेवक विठ्ठल बरबडे यांची भाषणे झाली. वैजिनाथ केसकर यांनी सूत्रसंचालन केले.भरत केसकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment