पीरयोगी महंत लक्ष्मणनाथ यांचे निधन, जळका येथे महंताच्या उपस्थितीत घेतली समाधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

पीरयोगी महंत लक्ष्मणनाथ यांचे निधन, जळका येथे महंताच्या उपस्थितीत घेतली समाधी

 पीरयोगी महंत लक्ष्मणनाथ यांचे निधन, जळका येथे महंताच्या उपस्थितीत घेतली समाधी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः धर्मनाथ नाथ संप्रदाय करीता मोठे योगदान असलेले व चंद्रगुप्तीचे सलग बारा वर्ष पीर असलेले पीरयोगी लक्ष्मणनाथ महाराज (वय-100) यांचे शुक्रवारी(दि.18)रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. शनिवारी जळका-बाभुळखेडा शिव येथे असलेल्या कानिफनाथ मंदीर परीसरात त्यांचा समाधी सोहळा संपन्न झाला.
समाधी सोहळ्यास साधूसंत,योगी,महंत व शिष्यगण उपस्थित होते.यावेळी त्यांचा धर्मनाथ नाथ संप्रदायाप्रमाणे विधीवत सोहळा,पुजन व श्रद्धांजली कार्यक्रम झाला.कै.लक्ष्मणनाथ महाराज यांचा बारा वर्षातून एकदा येत असलेल्या नवनाथ झुंड कार्यक्रमात मोठे योगदान असायचे.अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांचा भक्तवर्ग महाराष्ट्र व कर्नाटक  राज्यात होता.
समाधी सोहळा कार्यक्रमास चंद्रगुप्तीचे पीरयोगी सुखदेवनाथ, महंत योगी अमृतनाथ, महंत आकाशनाथ, महंत चंद्रभगवान, गजानान मुनी आश्रम (हिंगोली)चे मठाधिपती योगी ॠषीनाथ महाराज,महंत नवमीनाथ, मठाधिपती महंत बहसपतीनाथ, महंत दिपकनाथ सह राज्यातून अनेक साधूसंत, योगी, शिष्यगण व मोजके भक्तगण उपस्थित होते. त्यांनी त्रिबंकेश्वर, कदलीवंत, बेंगलोरची यात्रा केली.अनेक मोठ्या धार्मिक सोहळ्यात त्यांचा सहभाग असायचा.गायत्री जप, साधना, योग, प्राणायाम अन्नदानसह विविध विधायक कार्यासाठी त्यांनी प्रबोधन केले आहे.उपस्थितांनी श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here