कंटेनर व कारच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

कंटेनर व कारच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार!

 कंटेनर व कारच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार!

भीषण अपघातात लहान मुलगा बचावला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मनमाड महामार्गावरील निंबळक बायपासवर रविवारी दुपारच्या सुमारास कंटेनरने चारचाकी वॅगनार या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला असून कारमधील दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रवींद्र किसन पाटील (वय 45) व मनीषा रवींद्र पाटील (42 रा.पाचोरा जि.जळगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या अपघातातून पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा वाचला आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील निंबळक बाय पासवर काल दुपारी तीनच्या सुमारास जळगाव येथून पाटील कुटुंब हे पुण्याकडे जात  होते. यावेळी समोरून मोठा कंटेनर येत असताना  कंटेनरचा तोल सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीवर जाऊन आदळला, या अपघातामध्ये पाटील कुटुंबीय जागीच ठार झाले. या घटनेची माहिती विळद येथील ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा रुग्णालयांमध्ये या जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तीला नेल्यानंतर त्यांना या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. या अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा ऋषिकेश हा वाचला आहे. या अपघातात मुलाच्या डोक्याला जखम झाली असून त्याला येथील डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झाला असून त्याचा साथीदारही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here