हत्या की आत्महत्या.? सस्पेन्स अजूनही कायम... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

हत्या की आत्महत्या.? सस्पेन्स अजूनही कायम...

 हत्या की आत्महत्या.?

सस्पेन्स अजूनही कायम...

सुशांत सिंग राजपूत आत्महतेला 1 वर्ष पूर्ण


मुंबई । गेल्या वर्षी म्हणजेच 14 जून 2020 मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

गेल्या वर्षी 14 जूनला अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचे वडील, बहिणी यांचे जबाब नोंदवले होते. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. इतकंच नाही तर सुशांतसिंगची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली होती.
सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास थांबला आहे. अशात, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय या पाच यंत्रणांनी तपास करूनही वर्षभराने सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय कोणत्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. प्रकरणाला राजकीय
वळण मिळाले आणि ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता.
सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे.

No comments:

Post a Comment