खाजगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा दाखल..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, June 20, 2021

खाजगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा दाखल.....

 खाजगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा.....


नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

 निघोज तालुका पारनेर येथील बाबाजी गयाजी लंके यांच्याविरोधात  बेकायदा खाजगी सावकारी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

 याबाबतची  हकीकत अशी की, निघोज येथील नवनाथ लंके यांना बाबाजी लंके यांनी जानेवारी २०१७ मध्ये पन्नास  हजार रुपये व्याजाने दिले होते, सदरची रक्कम पाच रुपये शेकडा प्रमाणे दिली होती त्यापैकी तीस हजार रुपये चेक ने तर वीस हजार रुपये रोख दिले होते, त्यानंतर पुढील वीस महिने दरमहा अडीच हजार रुपये प्रमाणे सावकार बाबाजी लंके यांना व्याजापोटी  अदा केले , व तो सर्व व्यवहार पूर्ण केला  होता. पुढे नवनाथ लंके यांनी सन २०१९  मध्ये पुन्हा त्यांच्याकडून पन्नास  हजार रुपये व्याजाने घेतले , त्यानंतर पुढील अठरा  महिने त्यांना  दरमहा अडीच हजार व्याज अदा केले. व्याज वाढतच चालले असल्याने नवनाथ लंके यांनी पूर्ण रक्कम  एकरकमी   देतो

 परंतु काहीतरी रक्कम कमी करा अशी मागणी सावकार बाबाजी लंके यांच्याकडे केली, परंतु त्यास सावकार बाबाजी लंके यांनी नकार दिला, व नवनाथ लंके यांच्याकडे पैशांसाठी सतत तगादा लावला, व्याजाने रक्कम घेणारे नवनाथ लंके  यांनी एका मध्यस्थी मार्फतही सावकाराकडे व्याजाचे पैसे कमी करण्याचे साकडे घातले, परंतु त्यासही सावकाराने नकार दिला. सावकाराचा तगादा सहन न झाल्यामुळे अखेर नवनाथ लंके यांनी पारनेर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 त्यानंतर पारनेर पोलिसांनी तक्रारदार लंके यांच्या तक्रारीची पडताळणी करून   महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ व ४५ नुसार , विनापरवाना व बेकायदेशीर खाजगी सावकारी करून शोषण केल्याचा गुन्हा केला आहे, याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करत आहेत.


तालुक्यात सावकारी जोमात .....

गेल्या वर्षी जवळा येथील एका मुजोर  सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस एका महिलेने दाखवले होते. त्यावेळी तालुक्यातील सावकारांचे धाबे दणानले होते.  तालुक्यात अशी अनेक ठिकाणी सावकारी जोमात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here