इमामपूर येथे महिलेचा मृतदेह आढळला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

इमामपूर येथे महिलेचा मृतदेह आढळला

 इमामपूर येथे महिलेचा मृतदेह आढळला

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः इमामपूर येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इमामपूर येथील बहिरोबा मळा परिसरातील बाळासाहेब पांडुरंग टिमकरे यांच्या विहिरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने महिलेचा खून करून विहिरीत टाकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती सरपंच भिमराज मोकाटे यांनी पोलिसांना दिली. याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनकडुन पंचनामा करण्यात आला असून महिलेची ओळख पटविणे व अधिक तपास पोलिसांकडुन सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here