पावसाळ्यानिमित्त शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांना रेनकोटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

पावसाळ्यानिमित्त शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांना रेनकोटचे वाटप

 पावसाळ्यानिमित्त शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांना रेनकोटचे वाटप

आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात फ्रन्टलाईन वर्कर म्हणून कर्तव्य बजावणार्या शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांना पावसाळ्यानिमित्त रेनकोटचे वाटप आमदार अरुणकाका जगताप व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. शहर वाहतुक शाखेचे पो.नि. विकास देवरे यांच्याकडे रेनकोट सुपुर्द करण्यात आले. यावेळी उपक्रमाचे आयोजक जितेंद्र दत्तात्रय गायकवाड, जितेंद्र रमेश गायकवाड, राहुल संजय ठोंबरे आदी उपस्थित होते.
आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात पोलीसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. कोरोनाच्या संक्रमणाने अनेक पोलीस बांधव बाधित झाले. तर काहिंचा जीव देखील गेला. कोरोनायोध्दाची भूमिका त्यांनी बजावली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पोलीसांचे कार्य महत्त्वाचे ठरले. कोणत्याही परिस्थितीपुढे न डगमगता पोलीस दल अविरतपणे नागरिकांसाठी सज्ज असतात. त्यांच्या या कार्याला सलाम असून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पावसापासून पोलीसांचे रक्षण होण्याकरिता आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी रितेश गायकवाड, राजेंद्र जाधव, रौनक राहुरकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment