मोबाईल चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

मोबाईल चोर गजाआड.

 मोबाईल चोर गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घरातून मोबाईल चोरणार्‍या सराईत गुन्हेगार आज स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून चोरलेले मोबाईल ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.गणेश दिवाणजी काळे वय 24 वर्ष, वाकोडी फाटा असे आरोपीचे नाव आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, रणजीत सिंग छोटेलाल यादव वय 54 वर्ष, धंदा नोकरी रा. वाकोडी फाटा अहमदनगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की मी माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेलो असताना कोणीतरी अज्ञात इसम माझ्या परवानगीविना माझ्या राहत्या घरातून माझे दोन मोबाईल चोरून घेवून गेले आहेत. फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनील कटके पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना माहिती मिळाली की हा गुन्हा गणेश दिवानजी काळे रा.वाकोडी फाटा याने केला असून तो सध्या वाकोडी फाटा येथे आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील फकीर अब्बास शेख, विश्वास बेरड, शंकर चौधरी, दीपक शिंदे, कमलेश पाथरूड, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर यांनी मिळून वाकोडी फाटा येथे जावून शोध घेतला असता आरोपी गणेश दिवाणजी काळे वय 25 रा. वाकोडी फाटा यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करून पुढील तपासासाठी आरोपीला मुद्देमालासह पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.  पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भिंगार, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment