अत्याचारग्रस्त युवतीची आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

अत्याचारग्रस्त युवतीची आत्महत्या

 अत्याचारग्रस्त युवतीची आत्महत्या


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव परिसरातील 17 वर्षीय गर्भवती युतीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली. या युवतीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती राहिली. समाजात बदनामी होईल या भीतीने किंवा मानसिक धक्का बसल्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता गृहीत धरून युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे. अत्याचार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो), आत्महत्येस प्रवृत्त करणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगाव परिसरात 17 वर्षीय युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात इसमाने अत्याचार केला. यामुळे सदर युवती गर्भवती राहिली. अत्याचार झालेल्या युवतीला आपण गर्भवती राहिल्याचा धक्का बसला. या मानसिक त्रासातून तीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले.

No comments:

Post a Comment