कुरुंद गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधी देणार : राणीताई लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 13, 2021

कुरुंद गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधी देणार : राणीताई लंके

 कुरुंद गावासाठी जिल्हा परिषदेच्या  माध्यमातून भरीव निधी देणार : राणीताई लंके

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक  अंतराचे पालन करत कार्यक्रम




नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

कुरुंद  ता-पारनेर येथील जिल्हा परिषद च्या १५ व्या वित्त आयोगातून गावातील रोकडेश्वर मंदिरा समोर पेव्हिंग ब्लॉक च्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज जिल्हा परिषद सदस्य राणिताई निलेश लंके, मा.सभापती सुदाम पवार,सरपंच  गणेश मधे उपसरपंच संतोष कारखिले,अशोक कर्डीले सर,रमेश गायकवाड सर, ग्रामपंचायत सदस्य प्रमिलाताई निलेश शेंडगे,  सदस्य चेतन उबाळे,बाप्पू खेमनर, मा.उपसरपंच किसन नरवडे, युवा नेते रमेश गव्हाणे, निलेश लंके प्रतिष्ठानचे कुरुंद चे अध्यक्ष कृष्णा मुरवदे , दशरथ कुलाळ, फिरोज हवालदार,अनिल उबाळे,लहू गायकवाड,निलेश शेंडगे,लिपिक अजित यादव,ग्रामसेवक म्हेत्रे मॅडम व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी सोशल डिस्टटींग चे पालन व मास्क वापर करण्यात आले.  

 यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके  यांचा ग्रामपंचायत तर्फे सत्कार प्रमिलाताई शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला, गावासाठी जिल्हा परिषद मार्फत अजूनही भरीव असा निधी देण्याचे राणीताई यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment