कामे किरकोळ, विरोधकांकडून मात्र गाजावाजाच अधिक ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 13, 2021

कामे किरकोळ, विरोधकांकडून मात्र गाजावाजाच अधिक !

 कामे किरकोळ, विरोधकांकडून मात्र गाजावाजाच अधिक ! 

आ. नीलेश लंके यांनी फटकारले ! चोेंभूत येथे सव्वा कोटींच्या बंधा-यांचे भुमिपुजन 



नगरी दवंडी

पारनेर : प्रतिनिधी 

कोरोना महामारीच्या संकटातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तालुक्यासाठी आपण भरीव निधी उपलब्ध केला असून लोकप्रतिनिधीच्या कर्तव्याच्या भावनेतून आपण काम करीत आहोत. विरोधकांची अवस्था मात्र 'काम किरकोळ प्रसिद्धी मात्र हातभर' अशी झाली असल्याचे सांगत विरोधक बालीशपणे टिका करीत असल्याचा टोला आमदार नीलेश लंके यांनी लगवला. वारणवाडी येथे विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत आ. लंके यांनी त्यांना फटकारले.

चोंभूत येथील खाणीचा ओढा येथे ४६ लाख ७४ हजार रूपये खर्चाचा कोल्हापूर पद्धतीच्या सिमेंट बंधारा व दरोडी नाला येथे ७४ लाख १८ हजार रूपये खर्चाच्या सिमेंट बंधाऱ्याचे आ. लंके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी आ. लंके बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाधर शेळके, माजी सभापती सुदाम पवार, संतोष काटे, हनुमंत भोसले, जितेश सरडे, बाळासाहेब पुंडे, ठकाराम लंके, भास्कर उचाळे, संतोष उचाळे, बंटी दाते, दत्ता म्हस्के, अंकुश म्हस्के, सोमनाथ वरखडे, संदेश कापसे, संतोष कापसे, संतोष खाडे, बाबाजी येवले यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ.  लंके म्हणाले, कोरोना महामारीमुळे विकास कामांना खिळ बसली असली तरी मतदारसंघासाठी आपण निधी कमी पडू दिलेला नाही. जिल्हयात सर्वाधिक निधी खेचून आणण्यात आपणास यश आले असून जनतेने टाकलेली जबाबदारी आपण समर्थपणे पेलतो आहोत. कोरोना रूग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराबरोबरच आपले विकासाकडेही लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक  काय करतात याकडे आपण लक्ष देत नाही. त्यांच्यावर टिकाही करीत नाही. विरोधक मात्र किरकोळ कामांना हातभर प्रसिद्धी  देऊन आपल्यावर टिका करण्याचा केविलवाना प्रयत्न करतात हेच त्यांचे अपयश असल्याचा टोला त्यांनी लगवला. 

चोंभूत हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे आहे. त्यामुळे गेल्या पंधारा वर्षात केवळ २० लाखांचा निधी गावाला मिळाला. आता गेल्या पंधरा वर्षांचा अनुशेष भरून काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तोच धागा पकडून आ. लंके म्हणाले, म्हस्केवाडी येथील एस्केप, दोन बंधारे, एक कोटींचा रस्ता आदी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. विजेचा प्रश्‍नही येत्या काही दिवसांत मार्गी लागलेला असेल. पंधारा वर्षांचा अनुशेष आपण निश्‍चित भरून काढू अशी ग्वाही  देतानाच पक्षातील सर्व गटांनी असेच एकत्र राहून प्रत्येक निवडणूकीत 'घडयाळ' विजयी होईल यासाठी खंबिर साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. 


आ. लंके यांचे संयमी प्रत्युत्तर 

जिल्हा परिषदेमार्फत राबवियात येणा-या वेगवेगळया कामांचा भुमिपुजन समारंभ अलिकडेच पार पडला. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी आ. लंके यांच्यावर टीकाश्र सोडले होते. आ. लंके यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना संयमाने प्रत्युत्तर देत राजकारणापेक्षा आपणास समाजकारणात रस असल्याचे दाखवून दिले

No comments:

Post a Comment