संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मनोजकुमार आगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मनोजकुमार आगे

 संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मनोजकुमार आगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ही संघटना राज्यातील नियमित प्रसिद्ध होणार्‍या दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रशासकीय पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी राज्यात काम करते. संघटनेचे राज्यभर, जिल्ह्यात प्रतिनिधी असून, वृत्तपत्र तसेच संपादक व पत्रकार यांना येणार्‍या अडीअडचणी व त्यांना शासनाकडून कशी मदत मिळून देण्यात येईल याचे काम संघटना करते.
मनोजकुमार आगे हे गेल्या 34 वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून, त्यांचा अनुभव पाहता, संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे यांनी मनोजकुमार आगे यांना नुकतेच पत्र दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपादक पत्रकार यांची संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रशासकीय पातळीवर समस्या व त्यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे यांनी सांगितले. या निवडीचे जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जवाहर मुथा, अरविंद गाडेकर, नरेंद्र लचके, यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here