राहुरी नगरपालिकेत सत्ताधार्‍यांकडून अनागोंदी कारभार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

राहुरी नगरपालिकेत सत्ताधार्‍यांकडून अनागोंदी कारभार

 राहुरी नगरपालिकेत सत्ताधार्‍यांकडून अनागोंदी कारभार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राज्यमंत्र्याच्या अधिपत्याखाली असलेल्या राहुरी नगर पालिकेत सत्ताधारी गटाकडून मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप राहुरी येथील परिवर्तन पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.
राहुरी पालिकेत ठेकेदारीत अनेक नगरसेवकांचा हात आहे.सत्ताधरी गटाचा नेत्यांमुळे हा सावळा गोधळ सुरु असल्याचे म्हटले आहे . कोरोना काळात सर्व जिल्ह्यामधे कोरोना सेंटर झाले आहे . मात्र राहुरी नगर पालिकेने कोविड सेंटर सुरु केले नाही.यांनी निव्वळ जवळचे कार्यकर्ते संभाळण्याचे काम सुरु असल्याचे सत्ताधारी गटावर आरोप केले आहे . खा.सुजय विखे पाटील व मा आ शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरीत जनतेची सेवा करत आहे . मात्र पालिकेत सत्ता सत्ताधारी गटाच्या ताब्यात असल्याने आमचा आवाज दाबण्याचे काम राहुरी पालिकेत केले जात असल्याचे विरोधीपक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी सांगितले.ते म्हणाले की , जिल्हाधिकारी यांनी कोविड सेंटर सुरु करण्याचा आदेश दिला आहे . राहुरीत महिला व लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे . मात्र यासाठी खो घालण्याचे काम केले जात आहे . पालिकेत नगरसेवकच ठेकेदार झाले असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे .
राहुरी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका हददीत लसीकरण हे एकाच केंद्रवर चालू असल्याने हे वॉर्ड वाईज त्वरीत चालू करण्यात यावे.त्यामुळे नागरीकांची गैरसोय होणार नाही . सध्या सुरु असलेले नाले सफाईचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे . या नाले सफाई कामाची चौकशी करुन ठोकेदारावर कार्यवाही करावी , नगरपालिका मालकीचे असलेल्या गाळयांचे कोरोना लॉकडाऊन काळातील सन 2019 -20 व सन 2020-21 मधील भाडे माफ करावे , नागरिकांची कोरोना काळात आर्थिक परीस्थिती बिकट झाली असल्याने नागरिकांना घरपटटी व पाणीपटटी माफ करावी , नगरपालिका मालकीचे असलेल्या गाळयांचे कोरोना काळात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नवीन 25 % होणारी भाडे वाढ न करता नवीन करार करून द्यावा , नगरपालिकाचा माहे मार्च -2021 या महिन्याचा कचरा वाहतुक लॉकडाऊनच्या काळात शहर बंद असतांना शहरात कोठेही घन कचरा उचलण्याचे काम चालू नाही . यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी , कचरा वाहतुकीसाठी नवीन 7 गाडया आल्या असून त्या गाडया ठेकेदारास बेकायदेशिरपणे वापरण्यास देण्यात आल्या आहे . राहुरी नगरपालिकेचा पिण्याच्या पाण्याचा ठेका आगाऊ रक्कमेस देवून नगरपालिकेस तोटा झाला आहे . शहरातील साई कॉर्नर ते अग्निशमन केंद्रापर्यंत च्या डिव्हायडरचे काम विविध संघटना व व्यापा - यांनी विरोध करुनही डिव्हायडरचे काम करण्यात आले. राहुरी नगरपालिकेच्या परीवर्तन आघाडीच्यावतीने निवेदन राहुरी पालिकेचे प्रशासकिय अधिकारी घटकांबळे यांना निवेदन देण्यात आले. परीवर्तन आघाडीचे रावसाहेब ( चाचा ) तनपुरे, शिवाजी पाटीलबा सोनवणे, आर. आर. तनपुरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here