शिवराज्याभिषेक दिन उत्सव चिंभळे येथे उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 8, 2021

शिवराज्याभिषेक दिन उत्सव चिंभळे येथे उत्साहात संपन्न

 शिवराज्याभिषेक दिन उत्सव चिंभळे येथे उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे ग्रामपंचायत कार्यालयात 6 जून रोजी सरपंच सौ. छाया संजय गायकवाड व उपसरपंच राजेंद्र वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येऊन शिवराज्याभिषेक दिन उत्सव पार पडला. यावेळी शालेय विद्यार्थिनीनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वृक्ष लागवड करण्यात आली. ग्रामपंचायतच्या वतीने सोशल दिस्टसिंग नियमांचे पालन व्हावे यासाठी काही अंतरावर चौकोन आखून त्यामध्ये नागरिकांना सोशल डिंस्टसिंगच्या नियमानुसार उभे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री उद्धव गायकवाड सर यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या पार पाडण्यासाठी संजयराव गायकवाड ,सुनील गायकवाड सर , दीपक गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य) संजय राव सावंत, वैभव गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य). गणेशराव आढागळे, हनुमंत जगताप, चंद्रकांत गायकवाड सर (ग्रामपंचायत सदस्य ), डॉ. सचिन जाधव( तंटामुक्तीचे अध्यक्ष ), राजेंद्र मुर्तमोडे सर (ग्रामपंचायत सदस्य), प्रशांत जाधव, ग्राम विकास अधिकारी जगदाळे साहेब, वरिष्ठ लिपिक रमेश जाधव, सतीश ससाने, बबन सावंत बबनराव सांबरे भाऊसाहेब पगारे व्यक्तिंनी शिवराज्याभिषेक दिन पार पडणे कार्यक्रमाचे आयोजन पार पडण्यासाठी मदत केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here