‘फिनिक्स’चे काम राज्याला आदर्शवत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

‘फिनिक्स’चे काम राज्याला आदर्शवत

 ‘फिनिक्स’चे काम राज्याला आदर्शवत

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः फिनिक्स एनजीओ पारनेर तालुक्यातील कोरोणा परिस्थितीने गांजलेल्या गरजु परिवारांना किराणा वाटप करीत आहे.पहिल्या टप्प्यात ऍड.कृष्णा झावरे आणि मित्र परिवाराने 35किराणा किट दिले.दुसर्‍या टप्प्यात उद्योजक श्रीनाथ इंटर नॅशनलचे अध्यक्ष गवरामशेठ नवले यांनी 20किराणा किट दिले.तिसर्‍या टप्प्यात पारनेरचे सुपुत्र राम औटी सध्या इंग्लंड मधील बर्मिंगहम येथे संगणक अभियंता म्हणून सेवेत आहेत. त्यांनी व ईस्ट मिडलँड मराठी असोसिएशन व इतर मित्र परिवार यांच्याकडून 27किराणा किट दिले.त्याचे वाटप कान्हुर, टाकळी ढोकेश्वर,काकणेवाडी,गांजीभोयरे,पारनेर,बाभुळवाडे,पिंपळगाव तुर्क रोड,(केडगाव)अ.नगर , विरोली येथील गरजुंना वाटप करण्यात आले.त्या सोबत रग वाटप करण्यात आले. रग व किराणा किट वाटप सेवेत ऍड.कृष्णा झावरे,कान्हुर पठार पतसंस्थेचे उपाध्यक्ष सखाराम ठुबे,राजे शिवाजी पतसंस्थेचे शाखाधिकारी किसन सोनावळे साहेब,हरी मेजर,फिनिक्स स्वयंसेवक,स्वप्नील लोंढे,प्रसाद खिलारी,वैभव लोंढे आणि डॉ. सुरेश खणकर,जगदाळे सर व बोरुडे सर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका संर्पक प्रमुख पत्रकार संजय मोरे यांनी सहभाग घेतला.चौथ्या टप्प्यातील किराणा वाटप लवकरच होईल. इच्छुकांनी किराणा दान करावा असे अवाहन फिनिक्सचे अध्यक्ष विलास महाराज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment