वडझिराच्या सेंट्रल बँकेचा अनागोंदी कारभार न सुधारल्यास टाळे ठोकणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

वडझिराच्या सेंट्रल बँकेचा अनागोंदी कारभार न सुधारल्यास टाळे ठोकणार

 वडझिराच्या सेंट्रल बँकेचा अनागोंदी  कारभार न सुधारल्यास टाळे ठोकणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मिडिया सेलचे अध्यक्ष जितेश सरडे

अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादी आक्रमक



नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी

तालुक्यातील वडझिरे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक केली जात असून कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार केला जात आहे. त्यामुळे या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून अनागोंदी  कारभार न सुधारल्यास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभारात सुधारणा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मिडिया सेल अध्यक्ष जितेश सरडे  यांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसापासून सदर बँकेतील विविध घोटाळ्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवुनही अद्याप पर्यंत प्रकारे कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.तर स्थानिक पातळीवर या बॅंकेच्या तक्रारी वरिष्ठांकडे करूनही या बँकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत नाही. सदर अधिकाऱ्यांशी बोलणे केले असता आम्ही आपल्या तक्रारीची दखल घेऊ असे सांगितले आहे पण जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये वरील तक्रारी मध्ये सुधारणा न झाल्यास बँकेला टाळे ठोकण्यात येतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने दिला आहे.यावेळी वडझिरेचे सरपंच निलेश केदारे महेश निघुट तुळशीराम करकंडे धनंजय औटी,प्रसन्ना मोरे, बी एम मोरे,संकेत शेजवळ, अक्षय वाढवणे,निखिल बोरकर, गणेश मोरे उपस्थित होते.

वडझिरे येथील सेंट्रल बँकेमध्ये गेल्या एक वर्षापासून अतिशय अनागोंदी कारभार चालू आहे वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊनही सामान्यांना अनेक वेळा हेलपाटेे मारावे लागत आहेत .सदर बँकेचा उघडण्याची वेळ ही सकाळी १०.३० वाजता असतानाही अनेक वेळा कारणे देऊन ११.३० वाजता उघडली जाते. त्यामुळे लोकांना उन्हातानात नाहक त्रास सहन करावा लागतो.

वडझिरे गावासह परिसरातील चिंचोली पिंपरी जलसेन देवीभोयरे शेरीकोलदरा लोणीमावळा रांधे पाबळ या प्रमुख गावासह आजूबाजूच्या अनेक गावातील सर्वसामान्यांची खाती या बँकेत असून गेल्या सहा महिन्यापासून छोट्या कामासाठी अनेक खातेधारकांना हेलपाटे मारावे लागत आहे. या बँकेमध्ये शाखाधिकारी व इतर पदे रिक्त असून याचा ताण बँक व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणावर येत आहे.तर दुसरीकडेे सर्वसामान्यांना प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.


आमदार निलेश लंकेचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

वडझिरे येथील सेंट्रल बँक मध्ये सर्वसामान्यांची कामकाजामध्ये फार मोठी पिळवणूक केली जात असे अनेक खातेदारांना तासन् तास या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांसह शेतकरी पेन्शन योजना धारकांनी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे या संबंधीचे कल्पना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या कानावर घातली असता आमदार निलेश लंके यांनीही फोनवरून संपर्क करत या बॅंकेच्या अधिकाऱ्यांना आपला कारभार वेळीच सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत माझ्या सर्व सामान्य लोकांना जर त्रास झाला तर मी कोणत्याही अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा निर्वाणीचा इशारा आमदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment