सलून आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍यांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

सलून आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍यांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप

 सलून आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍यांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत येथे आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी सलून आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍याना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
सलून आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या मंडळींची संख्या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने नाईलाजाने या व्यवसायावर घातलेल्या निर्बंधांमुळं सलूनमधील कारागीर आणि ब्युटी पार्लर चालवणार्‍या भगिनी अडचणीत आल्या होत्या. सरकारने काही नियम पाळून हे व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं या व्यावसायिकांना मदत व्हावी म्हणून कर्जत तालुक्यातील सलूनमधील कारागीर आणि ब्युटीपार्लर चालवणार्‍या भगिनी यांना कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय दक्षता घ्यावी, याची माहिती देणारं पत्रक देण्यात आलं. लवकरच सर्व कारागीर आणि ब्युटीपार्लर चालक भगिनींना हे किट दिले जाणार आहे,  यावेळी सुनंदाताई पवार यांनी सर्वांशी संवाद साधला, यावेळी मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, शीतल धांडे, स्वाती पाटील, दिपक यादव  व इतर अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment