राहाता शहरातील 106 दिव्यांग बांधवांना एकत्रित तब्बल 3 लाख 58 हजार रुपयांचा लाभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

राहाता शहरातील 106 दिव्यांग बांधवांना एकत्रित तब्बल 3 लाख 58 हजार रुपयांचा लाभ

 राहाता शहरातील 106 दिव्यांग बांधवांना एकत्रित तब्बल 3 लाख 58 हजार रुपयांचा लाभ

प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका यांच्या मागणीला यश..!

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः दिनांक 27 मे रोजी दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करावा यासाठी राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या  प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरप्रमुख अविनाश सनांसे यांनी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री चंद्रकांत चव्हाण यांना निवेदन दिले होते. या निवेदनात या वर्षीचा दिव्यांग पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा अशी मागणी करण्यात आली होती. कोरोना महामारीत दिव्यांग बांधवांची प्रचंड आर्थिक हेळसांड होत असताना यास अनुसरून दिव्यांग बांधवानी नगरपरिषद राहाता येथे अपंग निधी मिळवण्यासाठी वारंवार मागणी केलेली होती मात्र अद्याप हा निधी मिळलेला नव्हता तरी अपंगांच्या हक्काचा पाच टक्के निधी तातडीने वाटप करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली गेली होती. तसेच निधी वितरित न झाल्यास पुढील 06  जून या तारखेला सर्व अपंग बंधूंना घेऊन नगरपरिषदे समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात दिला होता. यातून राहाता शहरप्रमुख अविनाश सनांसे तसेच गणेश भुजबळ, राहुल दुसाने, हर्षल जाधव आदी पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून जिल्हा संघटक अभिजीत कालेकर, शरदराव वारुळे, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, जिल्हा कार्यादयक्ष संजय शिंदे, राहाता तालुका अध्यक्ष दिनेश शेळके, उपाध्यक्ष विजय काकडे, दिपकराव घोगरे, संघटक वसंतराव काळे, अमोल कडू, कार्यादयक्ष सोमनाथ लहामंगे, उपसरपंच अनिलराव आहेर, विद्यार्थी संघटना तालुकादयक्ष रोमचंद कडू, मंगेश नळे, समन्वयक जगन्नाथ सरोदे, सचिव सुधाकर डांगे, सचिन आरने , दिव्यांग क्रांती तालुकादयक्ष भाऊनाथ गमे, उपाध्यक्ष नितीनकुमार भन्साळी, सुरेश गुगळे, नवनाथ पुंड, विशाल दाभाडे, योगेश चौधरी, रामदास तनपुरे आदी राहाता तालुका प्रहार पदाधिकार्‍यांचे राहाता शहरातील दिव्यांग बांधवांकडून कौतुक केलं जातं आहे.

No comments:

Post a Comment