राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतील नागरिकांना लसीकरणासाठी मोफत रिक्षा सेवा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतील नागरिकांना लसीकरणासाठी मोफत रिक्षा सेवा

 राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतील नागरिकांना लसीकरणासाठी मोफत रिक्षा सेवा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहर मनसेच्या वतिने शिर्डीकरांना मनसे भेट म्हणुन शिर्डी साईबाबाच्या मूर्तीला शॉल चढविण्यासाठी शॉल संस्थान कर्मचारी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली तसेच शिर्डी शहरातील नागरिकासाठी कोविड लसीकरण केंद्रावर जाण्या-येण्या करिता सोमवार पासुन 14 जुन 2021 पासुन मोफत रिक्षा सुविधा करण्याचा निर्णय मनसे च्या वतिने घेण्यात आला व मनसे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शिर्डी नगरपंचायत दत्तात्रय शिवाजी कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच शिर्डीकरांनी व जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असेही यावेळी मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी सांगितले. मनसे रिक्षा सेवेकरी व रिक्षा चालकांना फोन करा व 5 मिनिटात आपल्या घरी आमचा सेवेकरी आपली रिक्षा घेऊन हजर राहील असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी विकी गोंदकर, रुषीकेश कोते, विकी कांबळे, अतुल मुर्तैडक, संपत हातागळे, खोरख पवार, किशोर वाडेकर, प्रशांत ठोंबरे, मुकूंद उपासणी, अमोल देशमुख, शिवा फुंदे, राम मचे, अनिल धिवर, त्र्यंबक मोहीते, राजेंद्र कटारे, पंकज गोंदकर, सागर जगताप, अजय चौधरी, कैलास भुजबळ, रावसाहेब देशमुख, विजय कांचन, सुरेश सोनवणे, केशव उगले, ज्ञानेश्वर जगदाळे, रुपेश देवकर, कुणाल सांबारे, राहुल देशमुख, पोपट  काळे, विशाल कुलदगड, दिपक शेलार, प्रदिप गुलदगड, भिमा गाजरे, सोनु ठोबंरे, प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment