निघोज येथील फुटबॉल संघाची संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

निघोज येथील फुटबॉल संघाची संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी

 निघोज येथील फुटबॉल संघाची संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  निघोज येथील फुटबॉल संघाने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी दिली असून आजपर्यंत मिळालेली सर्वात मोठी ही देणगी असल्याने निघोज ग्रामस्थांनी या फुटबॉल संघाचे कौतुक केले आहे.
फुटबॉल संघाचे प्रमुख ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे यावेळी  बोलताना म्हणाले की गेली दिड महिन्यात निघोज पंचक्रोशीतील गावांसाठी या संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून फार मोठे आरोग्यदायी योगदान मिळाले आहे.गेली दिड महिन्यात पाचशे रुण्गांवर या कोव्हिड सेंटरमध्ये यशस्वी उपचार झाले असून यामुळे बहुसंख्य गावांतील रुण्गांना फार मोठा आधार मिळाला आहे.संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.आज हे कोव्हिड सेंटर नसते तर किती लोकांना नगर पुणे शिरूर या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले असते.मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सर्वसामान्य जनतेला परवडत नाही.म्हणून संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटर हे एक जनसामान्यांना मिळालेले एक ईश्वरी वरदान आहे.संदीप वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्‍यांनी याठिकाणी रात्रंदिवस कोरोना रुण्गांची सेवा करीत सेवाभाव केला आहे.अशाप्रकारे कोव्हिड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच लोकसहभागातून देणग्या मिळाल्या.कोव्हिड सेंटर चालवणे सोपं काम नाही.मात्र लोकांच्या सहभागातून हे शक्य झाले असून यासाठी फुटबॉल संघाने 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी दिली असून या देणगीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला हातभार मिळणार असल्याचा विश्वास लामखडे यांनी व्यक्त केला आहे.
यामध्ये देणगीचे योगदान देणारे फुटबॉल संघातील मान्यवर पुढीलप्रमाणे . भिमराव लामखडे, राहुल लाळगे,रोहित चासकर, सुभाष वराळ,आप्पा वराळ, दत्ता लाळगे,गौतम तनपुरे,करण लाळगे, किरण खंडू लाळगे,मनोज लामखडे, मोबित हावलदार,मोन्या वाखारे, निलेश वराळ,प्रेम पानमंद, रामा वराळ,रवि लंके, रोहित वरखडे, ऋषिकेश घोगरे, सचिन लाळगे,सागर रसाळ, सागर शेटे, संदीप भाउ वराळ, संदीप कवाद, सार्थक वरखडे, सौरभ उनवणे,शरद पवार, सुहास वराळ, सुनिल पवार, सुरेश लाळगे,उन्नत लामखडे, वैभव सरडे,  ओंकार विधाटे साहेब, विजय लामखडे, विलासराव वराळ, विशाल ढवण, स्वप्नील लामखडे, शुभम शेवाळे, सचिन दुतारे, विशाल गुंड,अक्षय पाठक, रमेश लाळगे, अतुल ढवण, शैलेश राउत, डॉक्टर संदीप बेलोटे, सुनिल गायखे, डॉक्टर नामदेव घोगरे, महेश चौधरी,अक्षय ढवळे,बाबु लंके, सुरज खोसे,बिरजु, सोहेल मोमीन, आदेश कोरडे, ओंकार धोंडिभाउ वरखडे, अक्षय गाडीलकर, राहुल वराळ सुभाष वराळ,आथर्व वराळ आदिंनी यामध्ये देणगीचे योगदान दिले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्‍यांनी या फुटबॉल संघाने दिलेल्या देणगीबद्दल सर्व देणगीदात्यांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here