राहुरीत 500 शिधाकत्रिकाची परस्पर वाटप करुन दोघा सेतु चालकाने शासनाची केली फसवणूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

राहुरीत 500 शिधाकत्रिकाची परस्पर वाटप करुन दोघा सेतु चालकाने शासनाची केली फसवणूक

 राहुरीत 500 शिधाकत्रिकाची परस्पर वाटप करुन दोघा सेतु चालकाने शासनाची केली फसवणूक

महिला करकुनाने पोलिसात केला गुन्हा दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तहसिल कार्यालयातून 500 नव्या कोर्‍या केशरी शिधापत्रिकांची चोरी करून अनाधिकृतपणे त्याच्यावर नकली सह्या करून त्या शिधापत्रिका परस्पर वाटप करण्यात आल्या . या प्रकरणी शासनाची फसवणूक केली म्हणून दोघां जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
श्रीमती भारती सुनिल पडदुणे वय 56 वर्षे ह्या राहुरी तहसिल कार्यालयात दोन वर्षापासून पुरवठा विभागात अव्वल कारकून पदावर नोकरी करत आहेत . त्यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , त्या पुरवठा संकलनाकडे नवीन शिधापत्रीका तयार करणे , दुबार शिधापत्रिका देणे .या प्रकारचे तसेच शिधापत्रिका बाबतची सर्व कामे करत असतात . सदर संकलनास शिधापत्रिका बाबतची कार्यवाही करणेकामी या कार्यालयाचे शिधापत्रिका जिल्हा पुरवठा अधिकारी अ . नगर यांचे कडुन दि .13 मार्च 2020 रोजी एकुण 500 नग केशरी नवीन कोर्‍या शिधापत्रिका प्राप्त झाल्या होत्या .
त्यांचे संकलनास एकंदर कामाचा लोड पाहता त्यांचे संकलनास लिपीक अथवा कोणताही मदतनीस नाही . त्यामुळे सदर पुरवठा विभागाचे शिधापत्रिका संबंधीतची सर्व कामे एकाच व्यक्तीस करावी लागतात . दि . 15 मार्च 2020 रोजी महा ई सेवा केंद्र क्र . 14 मौजे सात्रळ ता. राहुरीचे संचालक दिपक काळे तसेच महा . ई . सेवा केंद्र मौजे राहुरी फक्टरी ( देवळाली प्रवरा ) चे संचालक सचिन साळुके हे दुबार शिधापत्रिका मिळणेकरिता कार्यालयात अर्ज घेऊन आले . त्यावेळी श्रीमती भारती पडदुणे यांनी त्यांना दुबार शिधापत्रिका लिहुन घेणे कामी दिल्या होत्या .परंतु त्यांनी अर्जाप्रमाणे दुबार शिधापत्रिका तयार न करता त्याचा गैरवापर केला.त्या शिधापत्रिकांवर परस्पर कार्यालयीन कर्मचारी यांच्या बनावट सह्या करुन अर्जदारास नवीन बनावट शिधापत्रिका खर्‍या म्हणुन दि . 15 मार्च 20 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत ( निश्चित तारीख व वेळ माहीत नाही ) परस्पर देऊन शासनाची फसवणुक केली आहे . दिपक काळे राहणार सात्रळ ता . राहुरी व सचिन साळुके राहणार राहुरी फॉक्टरी ता . राहुरी यांनी दि . 15 मार्च 2020 ते दि . 30 डिसेंबर 2020 या कालावधीत राहुरी येथील कार्यालयीन कामकाजास मदत करण्याकरिता विश्वास संपादन करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या बनावट शिधापत्रिका तयार केल्या . तसेच त्यावर पुरवठा कार्यालयाच्या कार्यालयीन कर्मचारी यांच्या खोटया सह्या करुन शिधापत्रिका परस्पर वाटप करुन शासनाची फसवणुक केली आहे . श्रीमती भारती पडदुणे यांच्या फिर्यादीवरून दिपक काळे व सचिन साळुके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला

No comments:

Post a Comment