गुंडेगाव येथे लसीकरण, कोरोना मुक्तीकडे गावाची वाटचाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

गुंडेगाव येथे लसीकरण, कोरोना मुक्तीकडे गावाची वाटचाल

 गुंडेगाव येथे लसीकरण, कोरोना मुक्तीकडे गावाची वाटचाल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः नगर  तालुक्यातील 5000 लोकसंख्या असलेले गुंडेगाव  हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. काल दिनांक ( 4 जुन) रोजी कोव्हिड19 लसीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी  वाळकी प्रा.आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल ससाणे याच्या मार्गदर्शनाखाली गुंडेगाव  परिसरातील 60 वर्षे पुढील  140 लोकांना कोव्हिड लसीचे डोस देण्यात आले यावेळी प्रत्येकांची आरटीपीसार  टेस्ट तपासणी करण्यात आली होती यामध्ये एक ही रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नसून  गुंडेगाव  कोरोनामुक्तीकडे जात आहे मत मा.जिल्हा परिषद बाळासाहेब हराळ यांनी व्यक्त केले आहे.
गावातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत   कॉन्टॅक्ट ट्रेसींग आणि ग्राम दक्षता समितीने संशयीत तपासणीमध्ये सातत्य ठेवल्याने मेअखेर गावातील केवळ नगण्य  रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने एकही रुग्ण गावात आढळून आलेला नाही, असे संरपच सौ मंगलताई संकट व  ग्रामसेवक अशोक जगदाळे  यांनी  सांगितले.
गावातील 60 वर्षे पुढील 140 व्यक्तींना कोव्हिड 19 चा डोस यशस्वीपणे  राबवला आसून यावेळी  जिल्ह्याचे प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ,  उपसंरपच संतोष भापकर, ग्रामसेवक अशोक जगदाळे,  बबनराव हराळ, ह.भ.प महादेव माने, ग्रामपंचायत सदस्य- नानासाहेब हराळ, संतोष धावडे, सतिश चौधरी, संजय कोतकर, सुनिल भापकर,  संतोष सकट, भाऊसाहेब हराळ, राहुल चौधरी, संजय सकट, संतोष कोतकर, शिवनाथ कोतकर, प्रदिप भापकर,  पत्रकार संजय भापकर  सह आरोग्य सेवक डॉ विलास दाताळ,  अंकराम.पी.एन, वैशाली  धामणे, इंगळे, आशा सेविका कविता कुताळ, प्रिती भापकर, मनिषा कुताळ यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment