नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी

 नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात शुक्रवार (दि.4) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीस्वरास दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या विचिञ अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य दोन जण जखमी झालेची घटना घडली. या अपघातातील ट्रक चालकाची तपासणी करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात आणले असता मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी ट्रक चालकास चांगलाच चोप दिला.यावेळी पोलिस उपनिरिक्षक प्रदिप शेवाळे व पोलिस हवालदार सुहास गायकवाड यांनी प्रसांगवधान राखत परिस्थितीवर नियंञण मिळवत वातारण शांत केले.
 याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,नगरहून औरंगाबादकडे जाणार्‍या भरधाव वेगातील ट्रक चालक.... मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात ट्रकवर (क्रमांक एम.एच.13 डी.क्यु 0441) ट्रकवरील ताबा सुटल्याने समोरुन पुढे जात आसलेल्या दुचाकीस्वार विशाल बाबासाहेब कारभार (वय 17) रा.भालगांव (ता.गंगापूर जि.औरंगाबाद) हा या अपघातात जागीच ठार झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला शंकर वसंत पवार हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वराला चिरडून मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकास वाहनावरील ताबा सुटल्यामुळे पुढे म्हैस घेवून जाणार्‍या टेम्पो (क्रमांक एम.एच.17 बी.वाय 790) धडक दिल्याने टेम्पोमधील म्हैस जखमी होवून टेम्पो मधील दत्ताञय पंढरीनाथ नवथर (वय 30) रा.शहालीपिंप्री (ता.नेवासा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलात उपचार सुरु आहेत या अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती या अपघातातील मृतक विशाल कारभार याचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात करण्यात आलेले असून याचा मृत्युदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. मुकिंदपूरचे सरपंच सतिश निपुंगे व पोलिस कर्मचार्‍यांनी जखमींना नेवासा फाटा येथील सरकारी दवाखाण्यात आणण्यास मदत करुन वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यास मदत केली.

No comments:

Post a Comment