काँग्रेस कमिटीच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी फळांचे व्यापारी मुसाभाई बागवान यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

काँग्रेस कमिटीच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी फळांचे व्यापारी मुसाभाई बागवान यांची निवड

 काँग्रेस कमिटीच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी फळांचे व्यापारी मुसाभाई बागवान यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः काँग्रेस कमिटीच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी फळांचे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मुसाभाई याकुब बागवान यांची निवड तालुकाध्यक्ष संभाजीराव माळवदे यांनी केलेल्या शिफारशीनुसार शहराध्यक्ष रंजनदादा जाधव यांनी केली आहे.
सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा काँगेस पक्ष हा एकमेव पक्ष असल्याने नेवासा शहरातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी आपली निवड महत्वाची असल्याचे नियुक्ती पत्रात तालुकाध्यक्ष संभाजीराव माळवदे व  शहराध्यक्ष रंजनदादा जाधव यांनी म्हटले आहे.
अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर नेवासा शहरात काँग्रेसची भक्कम फळी तयार करू उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करू अशी ग्वाही उपशहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुसाभाई बागवान यांनी बोलताना दिली.
काँग्रेस कमिटीच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी मुसाभाई बागवान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर मुरकुटे,जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे,सुदामराव कदम, रमेश जाधव,तालुकाध्यक्ष संभाजीराव माळवदे, शहराध्यक्ष रंजनदादा जाधव,महिला आघाडीच्या शोभाताई पातारे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here