जागतिक पितृदिनानिमित्त मारुती खडके यांच्याकडून दहावीतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

जागतिक पितृदिनानिमित्त मारुती खडके यांच्याकडून दहावीतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच भेट

 जागतिक पितृदिनानिमित्त मारुती खडके यांच्याकडून दहावीतील  विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः जागतिक पितृदिना निमित्त स्व.श्री. दामू सदू खडके यांच्या स्मरणार्थ मारुती दामू खडके साहेब  ( एल अँड टी ) यांनी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 10’वी तील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच प्रोत्साहनपर भेट दिले.
कोरोना लॉक डाऊन परिस्थितीमुळे अनेक सामान्य तसेच मध्यम वर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडथळे येऊ नयेत...या सकारात्मक उद्देशाने फादर्स डे निमित्ताने ’विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेट’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल आयोजित कार्यक्रमात श्री खडके यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला,तर उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा देत, श्री खडके यांचे सर्वांनी कौतुक केले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती,इंजि.श्री प्रवीण कोकाटे,विद्यमान सरपंच मनोज कोकाटे, मा.सरपंच श्री बाजीराव हजारे, मा.सरपंच दीपक चौधरी, वि.का.से.सो चेअरमन श्री काशिनाथ बेल्हेकर, श्री मारुती खडके, श्री प्रसाद कदम सर, श्री रामचंद्र कोकाटे सर,श्री कृष्णा पाचारणे सर,श्री गवळी सर ,विद्यार्थी प्रतिनिधी आदी.उपस्थित होते.
ग्रंथ हे केवळ गुरू नसून ते मनुष्यास वडिलांप्रमाणे आधार आणि मित्रांसारखी सोबत करत असतात...या विचारावर चर्चा,उपचर्चा झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णा पाचारणे सर यांनी केले,तर,श्री रामचंद्र कोकाटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here