योग दिनाला बालचिमुकल्यांनी गिरवले योगाचे धडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

योग दिनाला बालचिमुकल्यांनी गिरवले योगाचे धडे

 योग दिनाला बालचिमुकल्यांनी गिरवले योगाचे धडे

ऑनलाइनद्वारे घेतलेल्या योग वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधून ऑनलाईनद्वारे घेतलेल्या योग वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यात बालचिमूकल्यांनी योगाचे धडे गिरवून योग दिन सार्थकी लावला.
प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुनिता कर्जुले यांच्या पुढाकाराने घेतलेल्या योग वर्गाला इयत्ता  तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वेगवेगळे योगासने  व  प्राणायाम करून योग दिन ऑनलाईन साजरा केला.आपल्या आचरणातून  करो योग...रहो निरोग..असा संदेशच या बालचिमुकल्यांनी यावेळी दिला.
प्रवरासंगम येथील पालकांचे सहकार्य व इयत्ता तिसरी वर्गाच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या वर्गशिक्षिका श्रीमती सुनीता कर्जुले यांचे याकामी मोलाचे  मार्गदर्शन लाभले.योगाच्या माध्यमातून भावी पिढीला निरोगी करण्यासाठी योगाचा अंगीकार करा त्यासाठी पालकांनी ही पाल्याचे हित जपण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ऑनलाइन संभाषणाद्वारे श्रीमती सुनीता कर्जुले यांनी बोलतांना केले.


No comments:

Post a Comment