पूर्ववैमनस्यातून चांदा येथे एकाची निर्घृण हत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

पूर्ववैमनस्यातून चांदा येथे एकाची निर्घृण हत्या

 पूर्ववैमनस्यातून चांदा येथे एकाची निर्घृण हत्या  

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील चांदा येथे गुरवारी रात्री 9.30 च्या दरम्यान नदीतील गजबजलेल्या भर चौकात उपसरपंच चांगदेव दहातोंडे यांचा पुतण्या ज्ञानदेव   सोपान दहातोंडे (वय 40)दुचाकीवर बसून मित्रा बरोबर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर बसून दोन जन आले आणि एकाने उतरून मयत न्यानदेव याच्या पाठीमागून धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि लगेच हल्लेखोर तेथून पसार झाले  वार पाठीमागून मानेवर जास्त जबरी बसल्याने घटनास्थळी रक्ताचा  सडा पडला होता  नगर येथील खाजगी रुग्णालयात जाऊपर्यन्त दहातोंडे हे मयत झाले होते या घटनेची वार्ता चांदा आणि परिसरात पसरल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले  चांदा गावचे पोलिस पाटील कैलास अभिनव यांनी सोनई पोलिसाना माहिती देताच स.पो.नि रामचंद्र करपे .श्रीरामपूर वीभागीय पो.नि.दीपली काळे.शेवगाव विभागीय पो.नि.सुदर्शन मुंढे घटनास्थळी तातडीने हजर झाले  चौकशी साठी एकाला ताब्यात घेतले असून लवकरच ही हत्या कोणत्या कारणाने झाली आणि कोणी केली याचा तपास लवकरच लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली सोनई पोलिसात उपसरपंच चांगदेव नारायण दहातोंडे यांनी फिर्याद दिली असून  फरार असलेला धनेश शिवाजी पुंड आणि एक अज्ञात इसमा विरोधात याचे   गु.र 201 /302 दाखल केला असून अधिक तपास स.पो नि सोनई रामचंद्र कर्पे हे करत आहे घटना स्थळी पंचनामा करून तेथे पडलेल्या रक्ताचे नमुने लॅबकडे पाठविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here