शेंडे कुटुंब खूप नशिबवान ः खासदार संभाजीराजे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

शेंडे कुटुंब खूप नशिबवान ः खासदार संभाजीराजे

 शेंडे कुटुंब खूप नशिबवान ः खासदार संभाजीराजे

संभाजीराजेंनी केले राजेंच्या अश्वाचे मन भरून कौतुक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
 नेवासा येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब शेंडे यांच्या घरी पाळलेल्या राजेनामक घोडयाच्या पाठीवर छत्रपती  शिवाजी महाराजांची हुबेहूब शिवप्रतिमा उमटलेली आहे.सदरील राजे या घोडयाबद्दल खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती घेतली असता मन भरून त्यांनी शेंडे यांचे कौतुक केले यावेळी संभाजीराजे म्हणाले की शेंडे कुटुंबीय खूप नशिबवान आहे हिरे मोती पेक्षाही मौल्यवान अश्व(राजे) यांनी आपल्या घरी जन्म घेतला आहे.
हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी संभाजीनगर कडे जात असताना, काही क्षणांसाठी नेवासा तालुक्यातील वडाळा बहीरोबा  येथे आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी धावती  भेट दिली.त्यावेळी माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीच्या वतीने  प्रगतशील शेतकरी नानासाहेब शेंडे व वडाळा बहिरोबा येथील आधार सेवा संकल्पचे अध्यक्ष जयवंत मोटे यांनी खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांना संत ज्ञानेश्वर महाराज पैसा खांबाची प्रतिमा देऊन स्वागत केले.
यावेळी  नेवासा तालुका तालीम संघाचे तालुकाध्यक्ष प्रतापभाऊ चिंधे,आधार सेवा संकल्पचे अध्यक्ष जयवंतमोटे, अश्वावर शिव प्रतिमा असलेले अश्वाचे(घोडा)मालक आणि शंभुसेना सामाजिक संघटना नेवासा तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे,भरत शिंदे ,काळे सर ,वैभव शेंडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here